Tue, Jun 25, 2019 21:29होमपेज › Solapur › सहकार महर्षींच्या जन्मशताब्दी वर्षात विकास कार्याला गती

सहकार महर्षींच्या जन्मशताब्दी वर्षात विकास कार्याला गती

Published On: Feb 04 2018 10:56PM | Last Updated: Feb 04 2018 8:18PMअकलूज : रवी शिरढोणे  

 राज्याच्या  सहकार  क्षेत्रात योगदान देणार्‍या सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचे 14 जानेवारी 2017 ते 14 जानेवारी 2018  हे वर्ष  जन्म शताब्दी वर्ष म्हणून  साजरे करण्यात आले. या निमित्ताने सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी घडल्या तसेच अनेक लोकोपयोगी निर्णय झाले. हेच त्यांच्या   जन्मशताब्दी वर्षाचे फलीत मानावे लागेल.

खा.विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रयत्नामुळे  मागील अनेक वर्षांपासून रखडलेला पंढरपूर- लोणंद या रेल्वे मार्गाला जन्मशताब्दी वर्षाच्या सुरूवातीलाच मंजुरी मिळाली.केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी जाहीर कार्यक्रमात ही रेल्वे म्हणजे जन्मशताब्दीची  नांदी असल्याचे सांगितले होते.तसेच मागील अर्थसंकल्पात अर्थिक तरतूदही करण्यात आली असून रेल्वे मार्ग सर्व्हेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

सहकार महर्षींच्या छायाचित्र अनावरण समारंभ प्रसंगी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकार महर्षींना पद्मविभूषण पुरस्कार मिळण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याचे अभिवचन दिले. तर नव्याने उभारलेल्या रत्नाई महिला वसतिगृहाच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी भविष्यात  दोन्ही काँग्रेसने एकत्र येऊन काम करण्याचे संकेत दिले. तर खा.विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्याची पूर्नबांधणी करण्याचेही सुचित केले.                       

  याच दरम्यान, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीने डाळिंब मार्केट सुरू केले. यामुळे डाळींबाला बाजारपेठ मिळाली असून याचा  शेतकर्‍यांना फायदा झाला. कोट्यावधीची उलाढाल या मार्केट ने केली. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील हजारों कार्यकर्त्यांनी मशाल फेरीतून  ज्ञानज्योत, सहकार ज्योत, महर्षी ज्योत, शिवामृत ज्योत, ग्रामविकास ज्योत यांचा सहभाग करून सहकार मरर्षींचे ऋण व्यक्त करून अनोखे अभिवादन केले. तर गौरव भारतीय लोककलेचा या सांस्कृतिक कार्यक्रमातून सुमारे 2 हजार शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी मिळाली. खा.विजयसिंह मोहिते-पाटील यांनी नेतृत्व केलेल्या मोटर सायकल रॅलीतून  सुमारे 5 हजार युवकांनी सहकार महर्षींच्या विकासाला पाठिंबा दर्शविला.

26 जानेवारी 2017 रोजी महावीर पथावर संचलन, चित्ररथ सादर करून परिसरात देशभक्तीची भावना दृढ होण्यास मदत झाली. विजयसिंह मोहिते-पाटीलर क्रीडा संकुल येथे 105 फुट उंचीच्या ध्वजस्तंभावर भव्य तिरंगा फडकला.तो नव्या पिढीत राष्ट्रप्रेम जागृत करण्यास प्रेरक ठरेल. माळशिरस तालुक्यात  सहकार  महर्षींच्या जीवन कार्यावर नामवंतांची गावोगावी व्याख्याने पार पडली. तर शिवरत्न शिक्षण संस्थेत 1 हजार युवकांनी रक्तदान कीरून रक्तदान शिबिरात सहभाग घेतला.अकलूज आगारात 3 शिवनेरी बस दाखल झाल्या.भगवतगीता सप्ताह सोहळ्यातून आध्यात्मिक संस्कार दिले. 
 डॉटर्स मॉम व शिवरत्न फौंडेशन यांच्यावतीने शिवरत्न शिक्षण संस्थेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू होत आहे. यामुळे ग्रामीण  महिलांच्या कुस्ती खेळाला संधी मिळणार आहे. आनंदनगर परिसरात अत्याधुनिक विज्ञानाचे तारांगण होण्याचे प्रस्तावित आहे. यासह कृषी प्रदर्शन, महाएक्स्पो प्रदर्शन, राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धाही पार पडल्या. सहकार मरर्षींनी शेती, उद्योग, कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजीक क्षेत्रात दिलेल्या योगदानाच्या कार्याला या जन्मशताब्दी वर्षात उजाळा देण्याचे कार्य झाले.