Mon, Apr 22, 2019 03:55होमपेज › Solapur › सोलापूर : आजाराला कंटाळून रेल्‍वेखाली वृद्धाची आत्‍महत्‍या

सोलापूर : आजाराला कंटाळून रेल्‍वेखाली वृद्धाची आत्‍महत्‍या

Published On: Jul 24 2018 9:56PM | Last Updated: Jul 24 2018 9:55PMमोहोळ: वार्ताहर 

आजारपणाला कंटाळून एका ६५ वर्षीय वृद्धाने रेल्वेच्या खाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी २४ जुलै रोजी मोहोळ रेल्वे स्टेशन ते वडवळच्या दरम्यान रेल्वे ट्रॅकवर घडली. वसंत प्रल्हाद ताकमोगे (रा. शिरापूर ता. मोहोळ) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. ही घटना उघडकीस आल्याने संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिरापूर सो. (ता मोहोळ) येथील वसंत प्रल्हाद ताकमोगे हे गेल्या अनेक वर्षांपासून आजारी होते. बरेच उपचार करुन देखील आजार बरा होत नसल्याने त्यांचे मानसिक खच्चीकरण झाले होते. त्यामुळे ते सतत निराश असायचे. मंगळवारी २४ जुलै रोजी सकाळी साडे दहा ते आकरा वाजण्याच्या दरम्यान ते मोहोळ ते सोलापूर जाणारे  रेल्वे रुळावर आले होते. त्यावेळी डाऊन लाईनने सोलापूरकडे जाणाऱ्या रेल्वेच्या खाली त्यांनी उडी घेऊन आत्महत्या केली.

सकाळी सव्वा आकरा वाजता उप लाईनने मुंबईकडे निघालेल्या मालगाडीच्या चालकाने मॅसेज दिल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मोहोळ रेल्वे स्टेशन अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह रेल्वे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या टनेमुळे शिरापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.