Mon, Jan 21, 2019 04:43होमपेज › Solapur › सोलापूर : शेतकरी संपात 'मनसे'ची उडी (video)

सोलापूर : शेतकरी संपात 'मनसे'ची उडी (video)

Published On: Jun 02 2018 1:42PM | Last Updated: Jun 02 2018 1:42PMमाळशिरस : तालुका प्रतिनीधी

राज्य भरात सुरू झालेल्या शेतकरी संपात आता मनसेनेने उडी घेतली असून  भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी माळशिरस तालुका मनसेच्यवतीने रस्त्यावर दूध व भाजीपाला टाकुन अंदोलन करण्यात आले.

यावेळी मनसेचे जिल्हा संघटक दिलीप घोत्रे, माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे, तालुका अध्यक्ष सुरेश टेळे ,जिल्हा उपाध्यक्ष मदन माने -देशमुख, कुंडलीक मगर, बाबा ननवरे, मंगलताई चव्हाण, सुरेश वाघमोडे, नवनाथ करे, अमित दोशी , राजू केमकर,  आकाश भिसे, नवनाथ शिंदे, नदीम मुलाणी, ज्ञानेश्वर कर्चे, विष्णू पवार, राजाभाऊ काशीद, विष्णू पवार,  भाऊ टेळे , हणुमंत बिरलिंगे यासह अनेक शेतकरी कार्यकर्ते उपस्‍थित होते.

शेतीमालाला दुधाला योग्य भाव नसल्याने शेतकऱ्यांनी १ जूनपासुन संप पुकारला आहे. वर्षभर अन्नधान्य, भाजीपाला दुधाला बाजार भाव मिळत नाही. सरकार शेतकऱ्यांच्या कोणत्याच मागण्या मान्य करीत नसुन सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करीत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी, सातबारा कोरा करा, शेतीमालाला उत्पादन खर्च अधीक ५० टक्के हमी भाव दुधाला हमी भाव आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. या वेळी दिलीप धोत्रे , आप्पासाहेब कर्चे , सुरेश टेळे यांनी आपले मनोगत व्यक्त करुन शासनाचा निषेध केला.