Tue, May 21, 2019 00:57होमपेज › Solapur › कुंभेज येथे विज्ञान कार्यशाळेला प्रतिसाद 

कुंभेज येथे विज्ञान कार्यशाळेला प्रतिसाद 

Published On: Jan 05 2018 1:29AM | Last Updated: Jan 04 2018 9:32PM

बुकमार्क करा
करमाळा : तालुका प्रतिनिधी

कुंभेज (ता. करमाळा) येथे यशकल्याणी सेवाभावी संस्थेने विद्यार्थ्यांना शास्त्रोक्‍त ज्ञान मुळातून मिळावे, यासाठी शास्त्रीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
यावेळी प्रथम माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम व स्व. बागल मामा यांच्या प्रतिमेचे पूजन करून या आधुनिक शास्त्रीय कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँकेच्या संचालिका रश्मी बागल, सरपंच नंदा शिंदे, माजी सरपंच दादा चौगुले, माजी उपसभापती भारत शिंदे, गोकुळ शिंदे, बाबा माळी, महादेव शिंदे, पैगंबर पठाण, बालाजी माने, अनिल यादव, नाना फाटके, अंनिसचे विष्णू गायकवाड, श्रेणीक खाटेर, ठाकुर, भंडारे सर, केंद्रप्रमुख कुलकर्णी, पर्यावरण सेवा योजना पुणे विभाग समन्वयक गणेश सातव, मुख्याध्यापक हनुमंत पाटील, कल्याणराव साळुंके, सीताराम बनसोडे, संतोष शिंदे, विष्णू पोळ, दादा जाधव, स्वप्नील माने, अनिल यादव, गणेश शिंदे, भिवा वाघमोडे आदी उपस्थित होते. 

प्रयोगशील शिक्षण हाच संशोधनाचा पाया असल्याचे मत आयसर, पुणेचे संचालक अशोक रूपनर यांनी यावेळी व्यक्त केले. अशोक रूपनर यांनी तब्बल दोन तास विविध शास्त्रीय प्रयोग मनोरंजनात्मक दाखवून विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रयोगामधील शास्त्र समजावून सांगितले. एवढेच नव्हे तर अनेकांना व्यासपिठावर बोलावून त्याना या प्रयोगात सहभागी करून घेतले. पाणी, हवा, वीज, गती आदींचे शास्त्रीय ज्ञान अशोक रूपनर यांनी दिले. यावेळी या कार्यशाळेचे आयोजक करे-पाटील म्हणाले की, मुलांना अभ्यास करताना घोकंमपट्टीवर  आधारित शिक्षणाची सवय झाली आहे. त्या सवयीला बाजूला सारून प्रत्यक्ष ज्ञानरचनेवर आधारित असलेल्या सोप्या वैज्ञानिक शिक्षणाची ओळख या कार्यशाळेतून होणार आहे. यावेळी रश्मी बागल म्हणाल्या की, अशा कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासातील गोडी वाढेल व विद्यार्थ्यांना संशोधनाची प्रेरणा मिळेल.
या

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रेणीक खाटेर  म्हणाले की, विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर अशा विज्ञान मैफिलीची आवश्यकता आहे. करमाळा अंनिसचे व्ही.आर. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन जागा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्‍त केली. या कार्यशाळेची सुरुवात मुलांनी हेलीकॉप्टर स्वतः बनवून ते हवेत उडवून केली. या कार्यशाळेमध्ये सहज, सोप्या अशा ज्ञानरचनेवर आधारित असलेल्या सुमारे 40 वैज्ञानिक खेळण्यांचा आणि प्रयोगांचा समावेश केला होता आणि मुलांनी पण उत्साहाने यात भाग घेतला.या कार्यशाळेत कुंभेज येथील दिगंबरराव बागल विद्यालयातील 290 विद्यार्थी, कुंभेज जि.प. प्राथमिक शाळेचे 70 विद्यार्थी, आयडियल इंटरनॅशनल स्कूल केतुर नं. 1  चे 75 विद्यार्थी, शिंदे वस्ती शाळेतील 40 विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत यशस्वी आणि उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.