Fri, Nov 16, 2018 23:31होमपेज › Solapur › सातारच्या भामट्याला सोलापुरात अटक

सातारच्या भामट्याला सोलापुरात अटक

Published On: Jan 29 2018 10:00PM | Last Updated: Jan 29 2018 9:59PMसोलापूर : प्रतिनिधी 

जिल्‍ह्यातील तरुणांना एमएसईबीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणार्‍या भामट्याला पोलिसांनी अटक केली. हा ठकसेन सातार्‍यातील असून त्याने तब्‍बल २० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. संदिप आनंदा राऊत (रा. कवठे ता. वाई जि. सातारा) असे अटक केलेल्या ठकाचे नाव आहे. 

याबाबतची माहिती अशी की, वीज मंडळातील वरिष्ठ अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत म्हणून राऊत यांनी बार्शी, तुळजापूर, मोहोळसह जिल्ह्यातील विविध भागातील जवळपास पंधरा मुलांकडून वीस लाखांहून अधिक रुपयांची रक्कम गोळा करून नोकरी लावण्याचे अमिष दाखविले होते. परंतु त्याने सातत्याने विचारणा करूनही नोकरी लावली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाली म्हणून सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिस निरीक्षक किशोर नावंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने पोलिसांनी राऊतला अटक केली आहे. 

दरम्यान, वेगवेगळ्या ट्रस्टच्या माध्यमातून निधी मिळवून देण्याचे आमिष दाखवून राऊतने अनेक महिलांचीही फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे.