अकलूज : तालुका प्रतिनिधी
पंढरीच्या वारीसाठी अधीर होऊन निघालेल्या वैष्णवांची मांदियाळी बुधवारी सहकार पंढरी अकलूजमध्ये विसावली आहे. येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात लाखो वैष्णवभक्तांनी मोठ्या उत्साहात पहिल्या गोल रिंगणाचा आनंद घेतला.
जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज (दि. १८)पुणे जिल्ह्यातून नीरा नदी पार करून सोलापूर जिल्ह्यात अकलूज येथे आगमण झाले. अकलूजच्या सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानावर पालखीचा पहिला गोलरिंगण सोहळा पार पडला. या वेळी लाखों रसिकांनी हा सोहळा अनुभवला.