Sat, Mar 23, 2019 02:30होमपेज › Solapur › नैतिकता व नियमांची सांगड घालून जि.प.चे कामकाज

नैतिकता व नियमांची सांगड घालून जि.प.चे कामकाज

Published On: Jan 09 2018 1:36AM | Last Updated: Jan 08 2018 10:30PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेचा कारभार केवळ शासकीय निर्णयावरच न करता नैतिकतेची बाजू धरून व नियमांची सांगड घालून प्रत्येकाच्या हिताचे काम करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेकडून होत असल्याची भावना जि.प. अध्यक्ष संजय शिंदे यांनी व्यक्‍त केली. 

देवकते प्रतिष्ठानच्यावतीने जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहात सोमवारी आदर्श पत्रकार पुरस्काराचे वितरण जि.प. अध्यक्ष शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष शिवानंद पाटील, सीईओ डॉ.  राजेंद्र भारुड, जि.प. सदस्य उमेश पाटील,  प्रतिष्ठानचे अध्यक्ष, माजी जि.प. सभापती अशोक देवकते, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे,  राजा माने, विजयकुमार पिसे आदी उपस्थित होते. 

यावेळी शिंदे म्हणाले, जिल्हा परिषदेकडून उत्कृष्ट वार्तांकनासाठी पुढील वर्षापासून आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मान करणार असून आचार्य बाळशास्त्री जांभेकर जिल्हा परिषद पुरस्कार या नावाने पुरस्कार देण्यात येईल. पहिल्या क्रमांकास 21 हजार आणि दुसर्‍या क्रमांकासाठी 15 हजार रुपये, तर तृतीय क्रमांकसाठी 10 हजार हजार रुपये, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी घोषणा जि.प. अध्यक्ष संजय शिंदे यांनी केली. यावेळी भारुड यांनीही मनोगतातून पत्रकारांचे अभिनंदन केले 

यावेळी प्रास्ताविकेत अशोक देवकते यांनी पुरस्कारामागची भूमिका विषद करुन  गेल्या आठ वर्षांपासून पुरस्काराचे वितरण करत असल्याचे सांगितले. जिल्हा परिषद व दक्षिण सोलापूर विकासकामात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या पत्रकारांना यापुढील काळातही गौरविण्यात येईल, असे सांगितले. सूत्रसंचालन सचिन जाधव यांनी केले. 

यावेळी संगमेश जेऊरे, प्रशांत कटारे, आप्पासाहेब गंचीनगोटे, बिसळसिद्ध  काळे, संजीव इंगळे, गौतम गायकवाड, सूत्रसंचालिका श्‍वेता हुल्ले, शेखर गोतसुर्वे, प्रशांत माने, शिवाजी सुरवसे, श्याम जोशी या  पत्रकारांचा देवकते प्रतिष्ठानच्यावतीने शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.  

यावेळी उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी उमेश पाटील यांनी आपल्या भाषणातून सत्ताधिकार्‍यांची कामकाजाची पध्दत चुकीची ठरत असताना ती सुधारण्यासाठी पत्रकार व विरोधी पक्ष टीका करतात. त्यामुळे सुधारणा होणे अपेक्षित असल्याचे मत त्यांनी व्यक्‍त केले.