Thu, Apr 18, 2019 16:06होमपेज › Solapur › शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्‍न आजही दाहकच : जावंधिया

शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्‍न आजही दाहकच : जावंधिया

Published On: May 03 2018 10:50PM | Last Updated: May 03 2018 9:35PMसांगोला : तालुका प्रतिनिधी

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपूर्वी शेतकरी, शेतकरी मजुरांचे जे प्रश्‍न होते ते आजही तितकेच दाहक व विचार करायला लावणारे आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंधिया (नागपूर) यांनी केले.

सांगोला येथे अस्तित्व समाजविकास संस्थेतर्फे आयोजित व्याख्यान व अहवाल प्रकाशन कार्यक्रमावेळी ते बोलत होते. ‘दुष्काळी भागातील शेतकरी-शेतमजुरांचे प्रश्‍न व पर्यायी विकासाची दिशा’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी चंद्रकांत देशमुख होते. यावेळी व्यासपीठावर दलितमित्र बी. पी. कांबळे, संस्थेचे अध्यक्ष शहाजी गडहिरे, ललित बाबर, तेजस्विनी सवाई, संस्थेच्या सचिवा सुनीता धनवडे, डॉ. बाळासाहेब मागाडे, अरुण कसबे, माजी नगराध्यक्ष प्रभाकर माळी, सुजित वर्मा आदी उपस्थित होते. 

जावंधिया पुढे म्हणाले की, दुष्काळी भागातून मजुरांचा पुरवठा कायम राहावा यासाठी दुष्काळी भाग दुष्काळीच राहावा, अशी भांडवलदारांची इच्छा असल्याने हा भाग कायम दुष्काळीच राहिला. प्रत्येक सरकारने या भागाकडे दुर्लक्ष केले. असे असले तरी या भागातील शेतकर्‍यांनी डाळिंब तसेच नगदी पिकांद्वारे आपला विकास साधला. 

या कार्यक्रमात पत्रकारितेत पीएच.डी. मिळविल्याबद्दल डॉ. बाळासाहेब मागाडे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शेतीसोबतच पर्यायी विकास साधल्याबद्दल माया गडहिरे (वाणीचिंचाळे), आक्काताई करांडे (करांडेवाडी), रामहरी भुसनर, दीपाली भुसनर (ह.मंगेवाडी), बाबुराव भजनावळे (मानेगाव), विजय शिंदे (मानेगाव), विठ्ठल मोरे (भोसे, ता. मंगळवेढा), सोपान गाडे (जुजारपूर),  काकासाो होवाळ (गौडवाडी), गोरख चंदनशिवे (गौडवाडी), रावसाहेब आलदर (गौडवाडी) यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विजय धनवडे, प्रवीण सूर्यगंध उपस्थित होते. नितीन वाघमारे यांनी आभार मानले.