Thu, May 28, 2020 12:30होमपेज › Solapur › सोनंद येथे अंगावर वीज पडून शेतकरी ठार

सोनंद येथे अंगावर वीज पडून शेतकरी ठार

Published On: Apr 16 2018 10:57PM | Last Updated: Apr 16 2018 10:42PMसांगोला : तालुका प्रतिनिधी 

 सोनंद (ता. सांगोला) येथील शेतकरी बाळासाो मारुती सावंत (वय 50) यांच्या अंगावर वीज पडून ते जागीच ठार झाले. ही घटना रविवारी (दि. 15) रात्री 8.15 वा. च्या सुमारास सोनंद-काशीदवाडी रोडवर 
घडली आहे. 

मृत बाळासाो सावंत रविवारी सायं. 5 च्या सुमारास जत रोडवरील शेतात सायकलवरून वैरण आणण्यासाठी गेले होते. या दरम्यान जोरदार वादळीवार्‍यासह मेघगर्जना सुरू होती. अशातच ते वैरण घेऊन सोनंद-काशीदवाडी रोडवरून सायकलवरून परत येत असताना त्यांच्या घरानजीक अचानक अंगावर वीज पडली. यामध्ये त्यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. ही घटना त्यांचे नातेवाईक केशव काशीद यांच्यासमोर घडली. पोलिसपाटील सिंधू काशीद यांनी घटनेची खबर  तहसिलदार संजय पाटील व पो.नि.राजकुमार केंद्रे यांना दिली.  हवालदार दत्तात्रय माने यांनी घटनास्थळी धाव घेवून बाळासाो सावंत यांच्या मृतदेहाचा पंचनामा करुन रात्री उशीरा शवविच्छेदन करण्यात आले. मयत बाळासाो सावंत यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, असा परिवार आहे. 

सोमवार आ.गणपतराव देशमुख यांनी मयत बाळासाो सावंत यांच्या घरी भेट देवून कुटुंबीयांचे सांत्वन केले. सावंत कुटुंबीयांना शासनाकडून योग्य ती मदत देण्यासाठी प्रयत्न करु असे आ.देशमुख यांनी सांगितले.  देवळे(ता.सांगोला) येथे रविवार रात्री 8.15 च्या सुमारास राजेंद्र अशोक माळी यांच्या घरासमोर बांधलेल्या म्हशीवर वीज पडल्याने म्हशीचा जागीच मृत्यू झाला. याबाबत, गांव कामगार तलाठी यांनी पंचनामा करुन तसा अहवाल सादर केला आहे.