Sun, Jun 16, 2019 11:58
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › सांगोला आगाराच्या मिनी बसची दुर्घटना

सांगोला आगाराच्या मिनी बसची दुर्घटना

Published On: Jan 21 2018 2:57AM | Last Updated: Jan 20 2018 8:23PMसांगोला : वार्ताहर

सांगोला आगाराच्या मिनी बसची बसस्थानकातच दुर्घटना झाल्यामुळे बसची स्थिती पाहून एस.टी.ने प्रवाशांची कशी थट्टा मांडली  हे दिसून आले. शनिवारी (20 जानेवारी रोजी) सांगोला आगाराची मिनी बस आपल्या नियोजित मार्गावरून आली. सदर बस बसस्थानकात आल्यावर सर्व प्रवाशी उतरल्यानंतर मिनी बसच्या पाठीमागील बाजूचा संपूर्ण भाग तुटून खाली कोसळला. त्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी गोळा झाली. अचानक असा प्रकार झाल्यामुळे व डबघाईला आलेली बस अखेर विचित्रपणे मोडल्यामुळे प्रवासीवर्गामधून मोठा संताप व्यक्त केला जात आहे.

सांगोला आगाराच्या अनेक बसेस अक्षरश: खुळखुळा झाल्या आहेत. तरी पण एस. टी प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे ही थट्टा कधी बंद होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मिनी बसची दुर्घटना बसस्थानकात ऐवजी जर रस्त्यावर झाली असती तर मात्र मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आणखी वाढली असती. रोज अनेक प्रवाशी एस.टीने प्रवाशी प्रवास करतात परंतु प्रवाशांना मिळणार्‍या सुविधाचा बोजवारा आहे. अशा डबघाईला आलेल्या एस.टीतून प्रवास करणे म्हणजे धोक्याचा प्रवास बनतो की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे.