Thu, Jul 18, 2019 04:05होमपेज › Solapur › सांगोला येथे अपघातात तिघे ठार

सांगोला येथे अपघातात तिघे ठार

Published On: Jan 20 2018 1:42AM | Last Updated: Jan 19 2018 11:16PMसांगोला : तालुका प्रतिनिधी

भरधाव आयशर टेम्पोने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणार्‍या दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चुलते-पुतण्यासह तिघे जण जागीच ठार झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी 9 च्या सुमारास सांगोला-कडलास रोडवरील दीपक सुरवसे यांच्या किराणा दुकानासमोर खारवटवाडी (सांगोला) या ठिकाणी झाला.

 दामू संदिपान भुईटे (वय 45), नितीन दाजी भुईटे (26), सुनील काकासाहेब इंगोले (24, रा. तिघेही भुईटेवस्ती, सांगोला) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. अपघातानंतर टेम्पोचालकाने घटनास्थळावरून पलायन केले.  

अपघाताची माहिती मिळताच पो.नि. राजकुमार केंद्रे यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तत्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. परंतु, त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. या घटनेमुळे सांगोल्यात हळहळ व्यक्‍त होत होती. 

सांगोला भुईटेवस्ती येथील दामू संदिपान भुईटे, नितीन दाजी भुईटे व त्यांच्या शेजारी राहणारे सुनील  इंगोले हे तिघे जण शुक्रवारी स. 9 च्या सुमारास (एमएच 3 सीक्यू, 2822 ) या दुचाकीवरून शेतात निघाले होते. त्यांची दुचाकी सांगोला कडलास रोडवरील दीपक सुरवसे यांच्या दुकानासमोरून जात असताना शेगाव (ता. जत) येथून डाळिंब घेऊन सांगोला मार्केटला निघालेला (एम.एच. 10 ए.डब्ल्यू 7941) हा आयशर टेम्पो कडलास कडून भरधाव वेगात समोरच्या टेम्पोंला ओव्हरटेक करत असताना समोरून येणार्‍या दुचाकीला जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला. 
अपघात इतका भीषण होता की टेम्पोची धडक बसताच दुचाकीसह तिघेहीजण रस्त्यापासून दूर फेकले गेले. अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीसह टेंम्पोचे 10 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर तिघांचे ग्रामीण रुग्णालायात शवविच्छेदन करण्यात येवून नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आले.  पांडूरंग भानूदास भूईटे (रा. भूईटेवस्ती सांगोला) पोलिसात यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास स.पो.नि. अमुल कादबाने करीत आहेत.