Sun, Mar 24, 2019 12:28होमपेज › Solapur › गॅस सिलिंडर स्फोटाने आग 

गॅस सिलिंडर स्फोटाने आग 

Published On: May 03 2018 10:50PM | Last Updated: May 03 2018 10:45PMसांगोला : तालुका प्रतिनिधी

 सोन्याचे दागिने तयार करणार्‍या व्यवसायाच्या ठिकाणी अचानक एकामागून एक असे चार सिलिंडरचे स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत बंगाली कारागिरांची दुकाने जळून भस्मसात झाली. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली, तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाल्याची घटनास्थळी चर्चा होती. आगीने उग्ररूप धारण केल्याने हवेत धुराचे लोट पसरले होते. एक तासाच्या अथक प्रयत्नातून आग आटोक्यात आली. ही घटना गुरुवारी दु.3.45 वा.च्या सुमारास सांगोला शहरातील सुनील भस्मे यांच्या वाड्यात घडली. रात्री उशीरापर्यंत या घटनेची पोलिसात नोंद करण्यात आली नव्हती. 
सांगोला शहरातील शिवाजी चौकानजीक सुनील भस्मे यांच्या वाड्यात मागील काही वर्षांपासून 7 ते 8 बंगाली कारागिर शहरातील सराफांकडील सोन्याचे दागिने बनवून देण्याचा व आटणीचा व्यवसाय करतात. दरम्यान गुरुवारी दु. 3.45 च्या सुमारास  अचानक सिलेंडरला आग लागली. तेथील कारागिरांनी बाहेर आग लागल्याचा आरडा-ओरड केला.  यावेळी नगरपालिकेत विशेष सर्वसाधारण सभा सुरू होती मात्र आगीच्या वृत्तामुळे नगराध्यक्षांसह सर्वांनी सभा मध्येच बंद करून घटनास्थळी धाव घेतली. 

घटनास्थळी मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, पाणीपुरवठा सभापती सचिन लोखंडे, नगरसेवक सतीश सावंत, रफीकभाई तांबोळी, जुबेर मुजावर, नगरपालिकेचे संजय दौंडे, अभिजीत ताम्हाणे, भोसले, सोमा ठोकळे, यांच्यासह अमर लोखंडे, बापूसाहेब भाकरे, ठेकेदार राऊत यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन जवानांना मदत केली. मात्र आगीने उग्ररुप धारण केल्याने एकामागून एक सिलेंडरचे स्फोट होत होते. आग आटोक्यात येत नव्हती. अखेर मंगळवेढा नगरपालिका व सांगोला नगरपालिकेच्या अग्निशमनबंबाने आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले. घटनास्थळी नायब तहसीलदार बागडे, नगराध्यक्षा राणी माने, उपनगराध्यक्ष चेतनसिंह केदार, नगरसेवक सुरेश माळी, गजानन बनकर, सुरज बनसोडे, महिला बालकल्याण सभापती सुनीता खडतरे, नगरसेविका भामाबाई जाधव, छाया मेटकरी, अप्सरा ठोकळे, अनुराधा खडतरे, शोभा घोंगडे, , आदिंनी भेट देऊन घटनेची माहिती  घेतली.