Fri, Jul 19, 2019 00:54होमपेज › Solapur › दलित संघटनांचा सांगोला तहसील कार्यालयावर मोर्चा

दलित संघटनांचा सांगोला तहसील कार्यालयावर मोर्चा

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 16 2018 11:00PMसांगोला : तालुका प्रतिनिधी  

  नवी दिल्ली येथील जंतरमंतर वर काही जातीयवादी शक्तींनी देशाची घटना जाळली. त्याचा निषेध करण्यासाठी काल सांगोला येथे तहसील कार्यालयावर विविध दलित संघटनांनी भव्य मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. 

देशाची राजधानी दिल्ली येथे काही राष्ट्रविरोधी, जातीयवादी शक्तिनी देशाचे संविधानाची प्रत जाळण्यात आली. या घटनेचे देशातील विविध भागात पडसाद उमटत आहेत. सांगोला येथे काल गुरुवार दि. 16 रोजी या घटनेचा निषेध म्हणून भर पावसात शहर व तालुक्यातील विविध संविधानप्रेमी संघटनांकडून मोर्चा काढण्यात आला. संविधानाची रक्षणाची जबाबदारी राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह सर्वांचीच आहे. संविधान जाळणाज्या समाजंटकांची चौकशी करून त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा व त्यांना देशाबाहेर हाकलून द्यावे. या मागणीसाठी सांगोला येथे म. फुले चौकातून 
मोर्चास सुरुवात झाली. यावेळी विजया बनसोडे, बाबासाहेब बनसोडे, मैना बनसोडे, सुरज बनसोडे, बाळासाहेब बनसोडे, अरविंद केदार, अ‍ॅड. महादेव कांबळे, बापुसाहेब ठोकळे, चंचल बनसोडे, मिलींद बनसोडे, तानाजीबापु बनसोडे, अप्सरा ठोकळे, विनोद रणदिवे, दामू साठे यांच्यासह मोठ्यासंख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.