Wed, Nov 14, 2018 05:55



होमपेज › Solapur › सरजीसह 7 आरोपींना मोक्का न्यायालयात हजर करणार

सरजीसह 7 आरोपींना मोक्का न्यायालयात हजर करणार

Published On: May 07 2018 11:57PM | Last Updated: May 07 2018 11:54PM



पंढरपूर : प्रतिनिधी

अपक्ष नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणातील प्रमुख आरोपी गोपाळ अंकुशराव ऊर्फ सरजीसह अन्य 3 जणांना 11 मे रोजी विशेष मोक्का न्यायालयापुढे उभा करण्यात येणार आहे. दरम्यान, यापूर्वी पोलिस कोठडीत असलेल्या 5 आरोपींना 22 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांची रवानगी येरवडा तुरुंगात करण्यात आली आहे. संदीप पवार हत्येप्रकरणी आतापर्यंत 21 आरोपींना अटक करण्यात आली असून सरजी गँगवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 

पंढरपूर येथील नगरसेवक संदीप पवार यांच्या खूनप्रकरणी भाजपचा जि.प. सदस्य आणि सरजी गँगचा प्रमुुख  गोपाळ अंकुशराव याला अटक करण्यात आली आहे. सध्या त्याची रवानगी कळंबा कारागृहात करण्यात आली असून, 11 मे रोजी सरजीसह आकाश बुरांडे, रूपेश सुरवसे, सचिन वाघमारे, ओंकार जाधव, प्रथमेश लोंढे, राहुल पगारे या 7 जणांना पुणे येथील मोक्का न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. संदीप पवार हत्या प्रकरणाचा तपास करीत असताना ही हत्या संघटित गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे जिल्हा पोलीस अधिक्षक एस. विरेश प्रभू यांनी या सर्व आरोपींना मोक्का लावण्याबाबतचा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे -पाटील यांना पाठवला होता. त्यानुसार विश्‍वास नांगरे -पाटील यांनी या सर्व आरोपीविरोदात संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यास मंजुरी दिली होती. या संपूर्ण  केसला मोक्का लावण्यात आला असून अद्यापपर्यंत 21 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अजूनही यातील संदीप अधटराव, विकी मोरे या प्रमुख संशयीतांचा पोलीस शोध घेत आहेत. तर चार दिवसांपूर्वी 2 सुपारी किलरनाही पोलीसांनी अटक केली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. 

दरम्यान अक्षय उर्फ बबलू सुरवसे ( रा.सांगली ) , पुंडलीक वनारे, मनोज शिरशीकर, भक्तराज धुमाळ, बंडु बारंगळे ( सर्व रा.पंढरपूर) या आरोपींना यापुर्वीच मोक्का न्यायालयाने  पोलीस कोठडी सुनावली होती. 7 मे रोजी त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर या आरोपींची रवानगी 22 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्यानंतर या आरोपींना येरवडा मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले आहे. 

या प्रकरणात आरोपींच्यावतीने  अ‍ॅड. ज्ञानेश्‍वर मोरे, अ‍ॅड. विद्याधर कोशे यांनी काम पाहिले आहे.