Sat, Apr 20, 2019 08:08होमपेज › Solapur › बेवारस वाळू ट्रकचा मालक सापडला

बेवारस वाळू ट्रकचा मालक सापडला

Published On: May 20 2018 10:25PM | Last Updated: May 20 2018 10:12PMनळदुर्ग : प्रतिनिधी

‘जप्त केलेला वाळुचा ट्रक बेवारस अवस्थेत’ या मथळ्याखाली दै. ‘पुढारी’त वृत्त प्रसिद्ध होताच महसूल खाते खडबडून जागे झाले आणि बेवारस ट्रकच्या मालकाने हजर होऊन तब्बल 14 लाखांचा दंड भरला.

सहायक पोलिस निरिक्षकांनी रात्रीच्या गस्तीदरम्यान मागील महिन्यात पकडलेल्या वाळूने भरलेल्या हायवा ट्रकला महसूल विभागाने दोन लाख 14 हजार दंड ठोठावला. तब्बल पंचवीस दिवसांनी हा ट्रक संबंधितांनी दंड भरून सोडवला. मात्र यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. 

नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाद्यक पोलिस निरिक्षक संतोष तांबे यांनी रात्री पेट्रोलिंग करत असताना नळदुर्ग-तुळजापूर मार्गावर चिवरी पाटी दरम्यान 24  एप्रिल रोजी एमएच 04 ईएल 7092 या हायवा ट्रकमधून क्षमतेपेक्षा जास्त चोरटी वाळू भरुन वाहतूक करताना संशयित रमेश शेषेराव गोरे रा. नागराळ, ता. लोहारा यास रंगेहाथ पकडले होते. मात्र मागील पंचवीस दिवसांपासून हा हायवा ट्रक नळदुर्ग महामार्ग पोलिस ठाण्याच्या मैदानासमोर उभा होता, अखेर संबंधिताने दंडाची रक्कम भरून हा ट्रक सोडवला.