Tue, Jun 18, 2019 20:18होमपेज › Solapur › वाळूमाफियांकडून तलाठ्याला धमकी 

वाळूमाफियांकडून तलाठ्याला धमकी 

Published On: Dec 25 2017 3:12PM | Last Updated: Dec 25 2017 3:12PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी
चोरटी वाळू वाहतूक करणार्‍या पाचजणांनी तलाठ्याला शिवीगाळ करुन दमदाटी करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मंद्रुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत, मालट्रकचा (क्र. एमएच 13 जी 4117) चालक, मोटारसायकलचा (क्र. एमएच 13 सीजी 6035) चालक आणि इतर तीन अनोळखी व्यक्तींच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तलाठी धनंजय बसवराज सुनगार (वय 31, रा. आहेरवाडी, ता. दक्षिण सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

विजापूर रोडवरील 13 मैल ते वांगी रोडवर तलाठी धनंजय सुनगार हे शनिवारी रात्री चोरटी वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाईसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी मालट्रक (क्र. एमएच 13 जी 4117) ट्रक थांबवून त्यातील वाळूची पावती मागितली. त्यावेळी ट्रकचालक आणि त्याच्यासोबत असलेल्या दुचाकी (क्र. एमएच 13 सीजी 6035) वरील व्यक्ती व इतर तीघांनी तलाठी सुनगार यांना शिवीगाळ  करुन दमदाटी करत सरकारी कामात अडथळा आणला. याबाबत मंद्रुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार शेख तपास करीत आहेत.