Tue, Nov 13, 2018 00:18होमपेज › Solapur › प्रांत अधिकाऱ्याच्या अंगावर वाळूचा टिपर घातला

प्रांत अधिकाऱ्याच्या अंगावर वाळूचा टिपर घातला

Published On: Jan 05 2018 12:20PM | Last Updated: Jan 05 2018 12:20PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

अवैध वाळूची वाहतूक रोखण्यासाठी कारवाई करण्यासाठी गेलेल्या प्रांताधिकार्‍याच्या अंगावर वाळूचा टिपर घालून खूनाचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना  गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास होटगी रोडवरील बसवेश्‍वर नगरजवळील लोखंडवाला प्रेस्टीज येथे घडली.

याबाबत प्रांताधिकारी शिवाजी नवनाथ जगताप (वय 33, रा. रुम नं. 1, हरेश्‍वरा अपार्टमेंट, बसवेश्‍वर नगर, होटगी रोड, सोलापूर) यांनी दिलेल्या  फिर्यादीवरुन टिपर (क्र. एमएच 12 पीझेड 7347) चालक व इतर तीघांविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक साळुंखे तपास करीत आहेत.