Wed, Jul 24, 2019 05:51होमपेज › Solapur › साहित्य मनातील भावनांना वाट करून देते

साहित्य मनातील भावनांना वाट करून देते

Published On: Dec 27 2017 1:21AM | Last Updated: Dec 26 2017 10:31PM

बुकमार्क करा

अंबाजोगाई : प्रतिनिधी

साहित्यातून प्रसन्‍नता मिळते. साहित्य मनातील भावनांना वाट करून देते. हसत जगणे जीवनाचा खरा अर्थ आहे. संमेलनातून आनंद मिळत असतो. मराठीचे  आद्यकवी मुकुंदराज यांच्या विवेक सिंधू ग्रंथांशिवाय जागर दिंडी परिपूर्ण होऊ शकत नाही, असे मत 39 व्या मराठवाडा साहित्य  संमेलनाचे अध्यक्ष ज्येेष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ तिवारी यांनी अध्यक्षीय समारोपात मांडले.

अंबाजोगाई येथे बीड जिल्हा परिषद शिक्षण विभाग व मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने 24 व 25 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या  कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अ. भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील, मसापचे सचिव दादा गोरे, कोषाध्यक्ष भास्कर बडे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, मसापचे सचिव दगडू लोमटे, उपशिक्षणाधिकारी (लातूर) शशिकांत हिंगोणेकर, शिक्षणाधिकारी भावना राजभोर यांची उपस्थिती होती. तसेच व्यासपीठावर माजी जि. प. सदस्य संजय दौंड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष विलास सोनवणे, अंबासाखरचे व्हाईस चेअरमन हनुमंत मोरे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सदस्य राहुल सोनवणे, शिक्षणाधिकारी भागवत सोनावणे, उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड, उध्दव बापू आपेगावकर, विद्यापीठ अधिसभेचे सदस्य गोविंद देशमुख, रामचंद्र तुरुके, अंबासाखरचे संचालक दाजीसाहेब लोमटे, श्रीरंग चौधरी, के. एस. आतकरे, राहुल केंद्रे, सुधाकर शिनगारे, प्रा. पंडित सूर्यवंशी, प्रकाश देशमुख, संजिवनी तडेगावकर, नरसिंग इंगळे, प्रा. डॉ. सतीष साळुंके यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी या संमेलनाच्या आयोजनाचे कौतुक करून साहित्य निर्मितीच्या उर्जेला हे संमेलन प्रेरणा देणारे ठरेल असा आशावाद व्यक्‍त केला. साहित्य निर्मितीमध्ये लेखकाचे व्यक्‍तिमत्त्व प्रतिबिंबित होत असते, लेखकाची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी दिसून येत असते असे सांगितले.
  मसाप केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी मसापचे साहित्य संमेलन आयोजन करणारे चार स्वागताध्यक्ष आमदार झाले असल्याचे सांगून  या संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनाही आमदार होण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्‍त केली.  यापुढील 40 वे मराठवाडा साहित्य संमेलन उदगीर येथे होईल, अशी घोषणा त्यांनी केली.

स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख म्हणाले, शिक्षण आणि साहित्य यांचा अतुट संबंध असल्यामुळे जिल्हा परिषदेचे शिक्षक आणि साहित्यिक यांचा जवळचा संबंध यावा आणि  जिल्हा परिषदेच्या शिक्षणाचा दर्जा वाढावा, यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले.  स्वतः 70 हजार रुपये खर्चुन शाळा डिजिटल करणार्‍या प्रतिभा माने या शिक्षिकेचा पतीसह भरपेहराव देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.

समारोप ात 91 व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलन, बडोदाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मसापचे सचिव दादा गोरे यांनी केले. सूत्रसंचालन  सहशिक्षिका  ज्योती शिंदे, तर आभार दगडू लोमटे यांनी मानले.