Wed, Sep 26, 2018 20:47



होमपेज › Solapur › सचिन कलुबरमे खून प्रकरणातील फरार दोन नगरसेवकांना अटक

कलुबरमे खून प्रकरण : दोन नगरसेवकांना अटक

Published On: May 20 2018 10:19AM | Last Updated: May 20 2018 12:46PM



मंगळवेढा : तालुका प्रतिनिधी

येथील सचिन कलुबरमे खून प्रकरणातील फरार आरोपी २ नगरसेवकांसह अन्य एकास गुजरातमधील वलसाड येथून ताब्यात घेण्यात आले आहे. फेसबुक वरील कमेंटवरुन  झालेल्या भांडणाचा राग मनात धरत शहरातील मुरलीधर चौकात २५ एप्रिल रोजी रात्री पावणे आठ वाजता सचिन ज्ञानेश्वर कलुबरमे याचा बाबा नायकवाडी याने तीक्ष्ण कोयत्याने मानेवर वार करूत खून केला  होता.

यात संशयित आरोपी म्हणून पांडुरंग नायकवाडी आणि प्रशांत यादव या दोन नगरसेवकांची नावे समोर आली होती. घटना घडल्यापासून दोन्ही नगरसेवक फरार झाले होते. तब्बल २५ दिवसांनी गुजरातमधील वलसाड शहरातून शनिवारी ताब्यात घेतले असुन त्यांच्या सोबत शिवराज बाळासाहेब ननवरे ( रा. क्रांती चौक पंढरपूर )असे त्या अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पांडुरंग नायकवाडी याचा तो नातेवाईक असल्याचे बोलले जात आहे.

रविवारी रात्री दीडच्या सुमारास त्याना मंगळवेढ्यात आणण्यात आले आहे. दोन्ही  फरार आरोपी नगरसेवकांना अटक व्हावी म्हणून मृत असलेल्या कलुबर्मे कुटुंबियानी महाराष्ट दिनादिवशी पोलिस स्टेशनसमोर आमरण उपोषण केले होते.

या घटनेला आता चार आठवडे उलटले असून जखमी असलेल्या प्रदीप पडवळे याने दिलेल्या फिर्यादीनुसार या गुन्ह्यात सहभागी असलेले प्रशांत यादव आणि पांडुरंग नायकवाडी हे  दोन नगरसेवक कट रचण्यात सहभागी आहेत. दरम्यान शनिवारी त्या दोघांना ताब्यात घेतले त्यांच्या शोधार्थ चार पथके नेमण्यात आली होती. विजय कुंभार यांच्या  गुन्हे अन्वेषण पथकास हे यश आले आहे. रविवारी न्यायालयासमोर त्यांना हजर केले जाणार आहे.