Wed, Sep 26, 2018 10:23होमपेज › Solapur › साडेअकरा लाखांचा ऐवज घर फोडून लंपास

साडेअकरा लाखांचा ऐवज घर फोडून लंपास

Published On: Jan 21 2018 2:57AM | Last Updated: Jan 20 2018 9:15PMकुर्डुवाडी : प्रतिनिधी 

येथील निवृत्त शिक्षक रवींद्र बाबुराव जाधव (रा. जिजाऊनगर) हे परगावी आपल्या मुलाकडे गेले होते. दोन दिवस त्यांचे घर बंद होते. चोरट्यांनी शुक्रवारी रात्री कुलूप तोडले. त्यानंतर घरातील लोखंडी कपाटाचेही कुलूप तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे 11 लाख 68 हजार 900 रुपयांचे दागिने लुटले. कुर्डुवाडी शहरात गेल्या महिन्यात अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. शहरात फिरून घरांवर नजर ठेवणारी टोळी येथील शहरात कार्यरत आहे. 

कुर्डुवाडी पोलिस ठाण्यामध्ये पोलिस कर्मचार्‍यांची संख्या कमी आहे. यापैकी जवळपास निम्मे पोलिस बाहेरगावी बंदोबस्तासाठी गेलेले होते. याच काळात चोरांनी संधी साधत ही मोठी चोरी केली आहे. परगावी जाणार असाल तर घरांमध्ये सोन्या-चांदीचे दागिने न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी अनेक वेळा केलेले आहे. परंतु, नागरिक याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करत आहेत. या चोरीचा तपास पोलिस निरीक्षक ईश्‍वर ओमासे करत आहेत.