Thu, Jan 24, 2019 04:21होमपेज › Solapur › आढीव येथे दरोडा; दोघांना पकडले

आढीव येथे दरोडा; दोघांना पकडले

Published On: Jan 10 2018 1:51PM | Last Updated: Jan 10 2018 1:50PM

बुकमार्क करा
पंढरपूर : प्रतिनिधी
आढिव (ता. पंढरपूर ) येथील शिवाजी गणपत कदम यांच्या घरावर पाच जणांनी दरोडा टाकून सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान,  दरोडेखोरांच्या टोळीतील दोघांना नागरिकांनी पकडले असून, त्यांना बेदम मारहाण केली आहे. या दोघा जखमींना पोलिसांनी उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. 

आढीव येथील विठ्ठलवाडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री  एक ते दीड वाजण्याच्या सुमारास जवळपास पाच जणांची टोळी दरोडा घालण्याच्या उद्देशाने आली होती. या वेळी एका वस्तीवर जाऊन घरास बाहेरून कडी लावून टोळी शिवाजी गणपत कदम यांच्या घरात घुसली. घराची मागील भिंत फोडून त्यांनी घरात प्रवेश केला, घरातील सोने, रोख रक्कम असा सुमारे एक लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांनी चोरून नेला आहे. 

दरम्यान, चोरी होत असल्याचे लक्षात आल्याने शेजारील लोकांनी आरडा-ओरडा केला. त्यामुळे बाजूच्या परिसरातील लोक धावून आले आणि टोळीतील दोघांना पकडण्यात नागरिकांना यश आले. या टोळीतील इतर तिघे पळून गेले आहेत. जमावाने या दोन्ही चोरट्यांना बेदम मारहाण केली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक एस. विरेश प्रभू यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली.