होमपेज › Solapur › माळशिरस तालुक्यातील रस्ते दुरुस्तीची कामे सुरू 

माळशिरस तालुक्यातील रस्ते दुरुस्तीची कामे सुरू 

Published On: Dec 02 2017 10:30PM | Last Updated: Dec 02 2017 10:00PM

बुकमार्क करा

माळशिरस : तालुका प्रतिनिधी 

माळशिरस तालुक्यातील अनेक रस्त्यावर खड्डे पडले होते. याबाबत सर्वसामान्य नागरिकांची होणार्‍या त्रासापासून मुक्तता व्हावी. यासाठी माळशिरस तालुका पंचायत समितीचे भाजप सदस्य अजय सकट यांनी ना. चंद्रकांत दादा पाटील व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे भाजप नेते उत्तमराव जानकर, के. के. पाटील , भाजप तालुकाध्यक्ष सोपान नारनवर, पं. स. गटनेते रणजीतबापू जाधव, अनिल जाधव, उत्तम माने, पक्षनेते माऊली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी रस्ते दुरूस्तीबाबत पाठपुरावा केला होता. याची दखल घेत तालुक्यातील अनेक रस्त्यावरील कामे सध्या सुरू झाली आहेत.

माळशिरस-पिलीव या मार्गावर या रस्ते दुरूस्तीचे कामे सुरू असताना पं. स. सदस्य अजय सकट यांनी कामाला भेट देत खड्डे चांगले भरून घ्यावेत अशा सूचना देऊन कामाची पाहणी केली. यावेळी तरंगफळचे नूतन सरपंच माऊली कांबळे, सावळा कांबळे, छगणदास कांबळे, महावीर कांबळे, ठेकेदार तरंगे उपस्थित होते.  

तालुक्यातील रस्ते दुरुस्तीची कामे सुरू झाल्याने सर्वसामान्य जनता भाजप सरकार बदल समाधान व्यक्त करीत आहे. यावेळी अजय सकट बोलताना म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा चांगला विकास  होत असून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न लवकर सुटत आहेत. 

होत असलेल्या विकास कामामुळे व सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी होत असल्याने सर्वसामान्य सरकार बद्दल आनंद  व्यक्त करीत आहेत.