Mon, Apr 22, 2019 23:41होमपेज › Solapur › पंढरपुरातील रस्त्यांच्या कामांची चौकशी होणार 

पंढरपुरातील रस्त्यांच्या कामांची चौकशी होणार 

Published On: Jan 12 2018 9:34PM | Last Updated: Jan 12 2018 8:36PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातर्गत पंढरपुरात केल्या जाणार्‍या रस्त्यांच्या कामाला होणारा विलंब, कामाची गुणवत्ता आणि इतर विविध प्रकारच्या तक्रारीबाबत चौकशी करुन  पंधरा  दिवसात अहवाल सादर करावा, असे आदेश विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिला. हा आदेश सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूरचे अधीक्षक अभियंता यांना दिले आहेत.

पंढरपूरामध्ये तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातून एकूण बारा रस्त्यांची कामे सुरु आहेत. त्यापैकी आठ रस्त्यांची कामे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत नगरपरिषदेमार्फत सुरु आहेत व इतर चार कामे तीर्थक्ष्‍ोत्र विकास आराखड्यातून केली जात आहेत.

या कामांची गुणवत्ता, युटीलिटी शिफटींग न करता कामे होत आहेत, विविध कार्यान्वयीन यंत्रणा यामध्ये असलेला समन्वयाचा अभाव यामुळे कामास होणारा विलंब अशा तक्रारी विभागीय आयुक्तांकडे आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आज पुणे येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांनी कामाची चौकशी करुन १५ दिवसात अहवाल सादर करावा, असे आदेश दिले असल्याचे दळवी यांनी सांगितले.

नगरपरिषदेच्यावतीने सुरु असलेल्या आठपैकी सहा रस्त्यांची कामे  सुरु असून दोन रस्त्यांची कामे अद्याप सुरु नाहीत तर  तीर्थक्षेत्र  विकास आराखड्याअंतर्गतची रस्त्यांची चार कामे प्रगतीपथावर आहेत.