Sun, May 26, 2019 20:38होमपेज › Solapur › संविधान जाळल्याच्या निषेधार्थ माळशिरसला रास्ता रोको

संविधान जाळल्याच्या निषेधार्थ माळशिरसला रास्ता रोको

Published On: Aug 19 2018 1:34AM | Last Updated: Aug 18 2018 9:11PMमाळशिरस :   तालुका प्रतिनीधी 

दिल्लीतील जंतर मंतर येथे संविधानांची प्रत जाळणार्‍याविरोधात  देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यास फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी माळशिरस येथील अहिल्यादेवी चौकात माळशिरस तालुका रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयासह विविध संघटनाच्या वतीने  शनिवारी सकाळी रास्ता रोको अंदोलन करण्यात आले. यावेळी या आंदोलनास अनेक समाजाच्यावतीने पाठींबा देण्यात आला यावेळी आरपीआय युवा अध्यक्ष समाधान भोसले, जिल्हा उपाध्यक्ष विकास धाईजे, तालुका अध्यक्ष धनाजी पवार, जि.प सदस्य बाळासाहेब धाईजे,नगरसेविका शोभा धाईजे, पाडुंरंग वाघमोडे, मारुती देशमुख, गणपतराव वाघमोडे, के पी काळे, प्रदिप धाईजे, अमीर पठाण, नंदकुमार केंगार, अनिल सावंत, किरण सावंत, आकाश सावंत, हर्षद धांईजे, दादासाहेब नामदास, भारत आठवले, प्रशांत धाईजे, दत्तु कांबळे, आबा धाईंजे, दत्तु पाटील, विवेक धाईंजे, राम कांबळे, अ‍ॅड धैर्यशील भोसले, रघुनाथ चव्हाण, सारीका पवार, कविता धाईंजे  आदी उपस्थित होते.

यावेळी दिलेल्या निवेदनात दिल्ली या ठिकाणी जंतर -मंतरवर संविधान प्रत जाळणार्‍यावर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यास फाशीची शिक्षा द्यावी. पंढरपूर या ठिकाणी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यावर दगड मारुन विटंबना करणार्‍यावर अ‍ॅट्रासीटीचा गुन्हा दाखल करून कडक शासन करावे तरी या मागण्यांचा शासन स्तरावर विचार व्हावा व दोशीना कडक शासन करण्यात यावे असे म्हटले आहे. यावेळी महीलांचा हस्ते नायब तहसिलदार काळे यांनी निवेदन स्विकारले.