Sun, Sep 23, 2018 23:56होमपेज › Solapur › सोलापुरात मंत्र्यांच्या साक्षीने पत्रकाराची सोन साखळी लांबवली

सोलापुरात मंत्र्यांच्या साक्षीने पत्रकाराची सोन साखळी लांबवली

Published On: Apr 14 2018 9:01PM | Last Updated: Apr 14 2018 9:02PMसोलापूर : प्रतिनिधी

माढा तालुक्यातील अरण गावात वृत्तांकनासाठी गेलेल्या वृत्त वाहिनीच्या पत्रकारच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरट्यांनी पोलिसांच्या गराड्यातून लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  विशेष म्हणजे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंढे यांची प्रतिक्रिया घेत असताना हा प्रकार घडला. 

पोलिसांचा मोठा फौजफाटा असूनही असा प्रकार घडणे पोलिसांच्या अकार्यक्षमतेचे लक्षण मानले जात आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. माळी समाजाच्या मेळाव्याला मंत्री मुंढे या उपस्थित राहिल्या होत्या. मेळावा पार पडल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यादरम्यान ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.

सुनील उंबरे असे संबंधित पत्रकाराचे नाव असून ते एका नामवंत वाहिनीसाठी काम करतात. याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद केली असून संशयित चोर कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

Tags : reporter, gold chain, stolen, pankalja munde, press conference, solapur news