Wed, Jun 26, 2019 17:50होमपेज › Solapur › निरा उजवा कालव्यातून पाणी द्या : कल्याणराव

निरा उजवा कालव्यातून पाणी द्या : कल्याणराव

Published On: Mar 12 2018 1:08AM | Last Updated: Mar 11 2018 10:26PMपंढरपूर : प्रतिनिधी

समान न्यायी पाणी वाटप धोरणानुसार पूर्ण क्षमतेने पाणी देण्याबाबत 5 मार्च रोजी  महाराष्ट्र जलसंपत्ती निययामक आयोगाने आदेश दिलेला आहे. त्याच वेळी त्यांनी भाळवणी ब्रँच 2 वर शेतकर्‍यांनी तयार केलेल्या पाणी वापर संस्था नोंदणीकृत करून करार नाम्यासह शेतकर्‍यांच्या ताब्यात देण्याचेही आदेश दिलेले आहेत. पाणी वाटप सल्लागार समितीलाही या आदेशाप्रमाण कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी दिली.

भाटघर धरणाचे निरा उजवा कालव्यामधुन ब्रँच नं.2 मधून भाळवणी, जैनवाडी, धोंडेवाडी, सुपली, भंडीशेगांव, वाडीकुरोली, केसकरवाडी, भंडीशेगांव, पळशी, गार्डी, शेंडगेवाडी व माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी, मळोली, महिला फळवणी, कोळेगांव, तोंडले, दसुर, शेंडेचिंच इत्यादी गावांना गेल्या पाच वर्षापासून पाणी वेळेवर मिळत नव्हते. त्यामुळे उन्हाळी हंगामामध्ये पिके जळून जावून शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान होत होते.

त्यामुळे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मुंबई यांचेकडे समानन्यायी पाणी वाटप धोरणानुसार शेतकर्‍यांना पाणी मिळणेबाबत अर्ज केलेला होता. त्यांची सुनावणी होऊन शेतकर्‍यांचे वतीने अ‍ॅड. सोमनाथ मोहन भिंगे  यांनी काम पाहिले होते. त्यामध्ये प्राधिकरणाने शेतकर्‍यांच्या बाजूने निर्णय दिला आहे.

प्राधिकरणाकडे न्याय मिळावा म्हणुन अर्ज केलेले सुरेश रामदास देठे व जयंत देवीदास शिंदे व अ‍ॅड, सोमनाथ भिंगे यांनी प्राधिकरणाने पाणी वाटपा बाबत दिलेल्या आदेशाची माहिती दिली. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती भगवान चौगुले, जयंत शिंदे, विजय नामदेव पवार, शिवाजी दगडू गवळी व सुधाकर कवडे, शहाजी पासले, उत्तम नाईकनवरे, शाखाधिकारी, कारखान्याचे सेक्रेटरी बाळासाहेब गाजरे, मुख्य शेती अधिकारी एस.एस.काझी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थि होते.