Thu, Aug 22, 2019 04:37होमपेज › Solapur › खा. ओवैसींना मानपत्राचा प्रस्ताव बहुमताने फेटाळला

खा. ओवैसींना मानपत्राचा प्रस्ताव बहुमताने फेटाळला

Published On: Apr 21 2018 1:04AM | Last Updated: Apr 20 2018 10:25PMसोलापूर :  प्रतिनिधी

एमआयएमचे संस्थापक अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवैसी यांना महापालिकेतर्फे मानपत्र देण्याच्या प्रस्तावावर शुक्रवारी सत्ताधारी भाजपने ‘शब्द’चलाखी दाखविली. विरोधी पक्ष शिवसेनेच्या मदतीने बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव फेटाळत सत्ताधार्‍यांनी एमआयएमचे मनसुबे उधळून लावले.महापालिकेची एप्रिलची सर्वसाधारण सभा महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमहापौर शशिकला बत्तुुल, आयुक्‍त डॉ. अविनाश ढाकणे, नगरसचिव प्रवीण दंतकाळे उपस्थित होते. सत्ताधारी भाजप तसेच विरोधी पक्ष शिवसेनेने खा. असदुद्दीन ओवैसी यांना महापालिकेतर्फे मानपत्र देण्याच्या विषयाला विरोध जाहीर केल्याने सभेत काय होईल,

याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. एमआयएमचे नगरसेवक रियाज खरादी यांनी ओवेसी यांना मानपत्र देण्याची सूचना मांडली. यावर उपसूचना मांडताना सभागृहनेते संजय कोळी यांंनी ‘शब्द’चलाखी करून एमआयएमला बुचकळ्यात टाकले. या प्रस्तावाला थेट विरोध न करता शब्दच्छल करून अप्रत्यक्षपणे विरोध दर्शविणारी अशी ही उपसूचना होती. ओवेसी यांनी कुठलेही काम सोलापूर किंवा महाराष्ट्रासाठी केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे ते सोलापूरकरिता ज्यावेळी विशेष असे करतील त्यावेळी या प्रस्तावाचा विचार करण्यात यावा, असे उपसूचनेत नमूद होते. यावर आक्षेप घेताना नगरसेवक खरादी यांनी रामदेवबाबांनी सोलापूरसाठी काय केले म्हणून त्यांना मानपत्र तेही बेकायदेशीरपणे देण्यात आले, असा खडा सवाल उपस्थित केला. एमआयएमचे गटनेते तौफिक शेख ओवेसींबाबत राजकारण करू नये, असे मत मांडले. यावेळी शिवसेनेचे सदस्य गुरुशांत धुत्तरगावकर यांनी ओवेसींना मानपत्र देण्याचा प्रस्तावाला कडाडून विरोध दर्शविला. अन्य विरोधी पक्षांनी या विषयावर मौन बाळगणे पसंत केले. त्यामुळे सत्ताधार्‍यांनी बहुमताच्या आधारे भाजपची उपसूचना मंजूर केली.

मनपाच्या सात विशेष समित्यांच्या सदस्यांच्या नियुक्त्या सभेत करण्यात आल्या. पक्षीय बलाबलानुसार करण्यात नियुक्‍त करण्यात आलेल्या सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. स्थापत्य समिती- नारायण बनसोडे, अमर पुदाले, वैभव हत्तुरे, अविनाश बोमड्याल, गुरुशांत धुत्तरगावकर, प्रथमेश कोठे, नरसप्पा कोळी, वहिदाबानो शेख, किसन जाधव. शहर सुधारणा समिती- देवी झाडबुके, विजयालक्ष्मी गड्डम, संतोष भोसले, शालन शिंदे, अमोल शिंदे, उमेश गायकवाड, परवीन इनामदार, रियाज खरादी, नागेश गायकवाड. वैद्यकीय सहाय व आरोग्य समिती- राजेश अनगिरे, निर्मला तांबे, वंदना गायकवाड, वरलक्ष्मी पुरुड, राजकुमार हंचाटे, सावित्रा सामल, प्रिया माने, अजहर हुंडेकरी, स्वाती आवळे. मंड्या व उद्यान समिती- सुरेखा काकडे, नागेश भोगडे, राजेश काळे, मंगल पाताळे, विठ्ठल कोटा, कुमूद अंकारम, फिरदोस पटेल, वहिदाबी शेख, सुनीता रोटे. विधी समिती अमित पाटील, श्रीकांचना यन्नम, प्रतिभा मुदगल, मीनाक्षी मुदगल, वत्सला बरगंडे, विनायक कोंड्याल, अनुराधा काटकर, तस्लीम शेख, सुवर्णा जाधव.

कामगार व समाजकल्याण समिती- रवी कैय्यावाले, सोनाली मुटकिरी, राधिका पोसा, श्रीनिवास रिकमल्ले, ज्योती खटके, अनिता मगर, विनोद भोसले, साजिदा शेख, गणेश पुजारी.  महिला व बालकल्याण समिती- संगीता जाधव, अंबिका पाटील, रामेश्‍वरी बिर्रू, अनिता कोंडी, सारिका पिसे, मंदाकिनी पवार, जॉन फुुलार, पूनम बनसोडे, ज्योती बमगुंडे  समांतर जलवाहिनी योजना मंजूर करुन आणल्याबद्दल महापौर शोभा बनशेट्टी, तत्कालीन केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू. राज्यापाल सी. विद्यासागरराव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अभिनंदनाच्या भाजप (सहकारमंत्री गट) सदस्यांच्या प्रस्तावावर वाद होऊ नये म्हणून पालकमंत्री गट तसेच विरोधकांच्या मागणीचा मान राखत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या नावांचाही उल्लेख करुन अभिनंदनाचा ठराव पारित केला. जम्मू-काश्मिरच्या असिफा या मुलीवर बलात्कार करुन हत्या केल्याच्या घटनेबाबत निषेध करणारा व आरोपींना फाशी देण्याची मागणी करणार्‍या एमआयएमच्या प्रस्तावावर  सर्वपक्षीय नगसेवकांनी सहमती दर्शवित एकमताने ठराव केला. 

Tags : Solapur,  rejected, proposal,  memorandum, majority,  MP Owaisi