Wed, Jun 26, 2019 12:16होमपेज › Solapur › पंढरपूर राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन

पंढरपूर राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

महाराष्ट्रातल्या जनतेची फवणूककरून सत्तेवर आलेल्याा सरकारच्या विरोधात ज़नतेच्या मनात असलेला उद्रेक तसेच जनतेची होत असलेली फसवणूक, महागाई या अन्य मागण्यांसाठी झोपलेल्या सरकारी यंत्रणा व भाजप सरकारचे डोळे उघण्यासाठी आज पंढरपूर तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्यावतीने भव्य हल्लाबोल आंदोलन करण्यात  आले. 

शेतकर्‍यांची कर्जमाफीत झालेली फसवणूक, विजेचा प्रश्‍न, अतिमहागाई, कर्जबाजारी झालेले महाराष्ट्र राज्य, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्या, उद्योगात व रोजगारात झालेली घसरण, नागरी समस्या, शिष्यवृत्तीचे प्रश्‍न, आरोग्याची व्यवस्था, कुपोषण, बालमृत्यु, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न, शेतीमालाचा हमीभाव असे अनेक दैनंदिन जीवनातल्या प्रश्‍नावर भाजप मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ खुशाल डोळेझाक करून सामान्य जनतेला फसवत आहेत.  त्याच्या विरोधात खा. शरद पवार, आ.अजित पवार, खा.सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस च्यावतीने  हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.  याकडे  भाजप सरकारने लक्ष घालून तातडीने प्रश्‍न  सोडवावेत असे निवेदन तहसीलदार यांना आंदोलन करून देण्यात आले. 

यावेळी राष्ट्रवादीचे सुभाष भोसले, राजूबापू पाटील, युवराज पाटील, तानाजी पाटील, प्रांतीक सदस्य आप्पासाहेब जाधव, तालुकाध्यक्ष दिपक पवार, पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघ अध्यक्ष दिपक वाडदेकर, पंढरपूर युवक शहराध्यक्ष संदीप मांडवे, किसान सभेचे मारूती जाधव, ज्येष्ठ सेल शहराध्यक्ष आण्णासाहेब पवार, तालुकाध्यक्ष महादेव पाटील, शहराध्यक्ष सुधीर भोसले, विद्यार्थी प्रदेश सचिव संकेत ढवळे, युवक तालुकाध्यक्ष अवधुत गायकवाड, अमरजित गोडसे, अनिल सप्ताळ, मनोज आदलिंगे, कृष्णा माळी, अतुल खरात, सुजित गायकवाड, गणेश बनसोड, दिलीप भोसले, सुभाष बागल, साधनाताई राऊत, रंजनाताई हजारे, अनिताताई पवार, सुदामती माळी, मनिषा शिंदे, जयश्री माडगुळकर, चारूशिला कुलकर्णी, गणेश चव्हाण, भास्कर जाधव, बंडू हजारे, समाधान सुरवसे, भूषण गायकवाड, गुलाब मुलाणी, रशिद शेख आदी उपस्थित होते.