Sat, Jul 20, 2019 08:42होमपेज › Solapur › लग्नाच्या आमिषाने विवाहितेवर बलात्कार

लग्नाच्या आमिषाने विवाहितेवर बलात्कार

Published On: Jan 23 2018 1:11AM | Last Updated: Jan 22 2018 10:23PMसोलापूर : प्रतिनिधी

विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणार्‍या तरुणाविरुद्ध जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गोपाळ सिद्राम सुरवसे (वय 31, रा. निराळे वस्ती, क्रांतीनगर, सोलापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. सुरवसे यास न्यायालयाने 23 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. याबाबत पीडित विवाहितेने फिर्याद दाखल केली आहे.यातील पीडित विवाहितेशी गोपाळ सुरवसे याची 2015 मध्ये ओळख झाली. या ओळखीतून सुरवसे याने तिच्याशी जवळीक साधून ‘मला तुमच्याशी लग्न करायचे आहे, मी तुम्हाला व्यवस्थित सांभाळतो’, असे म्हणून तिला लग्नाचे आमिष दाखविले. त्यातूनच सुरवसे याने पीडितेवर पंढरपूर, दिवा ठाणे, कोनापुरे चाळ, मड्डी वस्ती, माने वस्ती येथे जबरदस्तीने शरीरसंबंध केला. त्यानंतर सुरवसे याने पीडितेकडे पैशाची मागणी केली व तुझ्याशी लग्न करणार नाही, असे म्हणून दिवा ठाणे येथे निघून गेला. त्यानंतर सुरवसे हा तिच्या मोबाईलवर फोन करून मी कधीही सोलापूरला येऊन तुला व तुझ्या मुलीला सोडणार नाही, म्हणून शिवीगाळ व दमदाटी करीत असे, म्हणून पीडितेने जोडभावी पेठ पोलिस ठाणे गाठून याबाबत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी सुरवसे यास अटक केली आहे.