Mon, Jan 21, 2019 09:21होमपेज › Solapur › सोलापुरातील नरखेडमध्ये विवाहितेवर बलात्‍कार

सोलापुरातील नरखेडमध्ये विवाहितेवर बलात्‍कार

Published On: Aug 05 2018 4:34PM | Last Updated: Aug 05 2018 4:34PMमोहोळ: वार्ताहर

विवाहित महिलेस जीवे मारण्याची धमकी देऊन एकाने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. ही घटना गेल्या दोन वर्षांपासून घडत असल्याचे सांगण्यात येत आहे.याप्रकरणी मोहोळ पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या दोन वर्षापूर्वी नरखेड तालुका मोहोळ येथील खंडू नवनाथ खंदारे यांनी गावातील महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तेव्हापासून तो तिच्या इच्छेविरोधात वेळोवेळी महिलेवर लैंगिक अत्याचार करत होता. या घटनेची कुणाला माहिती दिली तर तुझ्या घरातील व्यक्तींनादेखील ठार मारून टाकेन अशी धमकी त्याने पिडीत महिलेला दिली होती. त्याच्या त्रासाल कंटाळून महिलेने कुटुंबियांना सांगितल्यानंतर या अत्याचारची नोंद पोलिसात करण्यात आली.

या प्रकरणी अत्याचारग्रस्‍त महिलेने मोहोळ पोलिसात खंडू नवनाथ खंदारे (रा. नरखेड ता. मोहोळ) याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.