Sun, Jul 21, 2019 01:29होमपेज › Solapur › चिखलठाण येथे अल्पवयीन मेहुणीवर अत्याचार

चिखलठाण येथे अल्पवयीन मेहुणीवर अत्याचार

Published On: Dec 18 2017 2:44AM | Last Updated: Dec 17 2017 11:44PM

बुकमार्क करा

करमाळा : तालुका प्रतिनिधी

उसाच्या फडातील कोपीत पत्नी नसल्याची संधी साधून अल्पवयीन नऊ वर्षीय मेहुणीवर ऊसतोड करणार्‍या मेहुण्याने अत्याचार केला. हा प्रकार करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथील ऊसतोडीच्या फडात घडला आहे. या प्रकरणी संशयित आरोपीवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 13 डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता चिखलठाण शिवारातील उसाच्या फडात घडली. 

अल्पवयीन मेहुणीवर अत्याचार करून कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी मेहुण्याने दिली होती. संशयित आरोपी हा गरड पाटोदा (तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर)  येथील असून तो पत्नी, मुले व लहान मेहुणीसह चिखलठाण येथे ऊसतोडीसाठी आला होता. 

मुलगी आजारी असल्याने अल्पवयीन बहिणीला पतीच्या जवळ ठेऊन ती जामखेड येथे औषधोपचारासाठी गेली होती. पीडित मुलगी ऊसतोड ठिकाणी कोपीत एकटीच झोपल्याचे पाहून त्या ठिकाणी रात्री दहा वाजता प्रवेश करून तोंडात बोळा कोंबून आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर ही माहिती मुलीने जामखेडवरून परत आलेल्या बहिणीला सांगितली. नंतर तिला त्रास होऊ लागल्याने जामखेड येथे उपचारासाठी नेल्यानंतर वैद्यकीय अधिकार्‍यास मुलीवर अत्याचार झाल्याचे निदर्शनास आल्याने जामखेड पोलिसांना ही माहिती देण्यात आली. याबाबत पीडित मुलीच्या बहिणीने पतीविरुद्ध जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करून हा गुन्हा करमाळा हद्दीत घडल्याने तो करमाळा पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे.