Tue, Apr 23, 2019 14:00होमपेज › Solapur › लग्‍नाचे आमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार, संशयितास अटक

लग्‍नाचे आमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार, संशयितास अटक

Published On: Jan 23 2018 9:37PM | Last Updated: Jan 23 2018 9:32PMबार्शी ः तालुका प्रतिनिधी 

विवाहित महिलेचा घटस्फोटाचा  दावा न्यायालयात सुरू असल्याचा गैरफायदा घेऊन  एकाने 32 वर्षीय विवाहित महिलेस लग्नाचे आमिष दाखवून पाच वर्षे बलात्कार केल्याची घटना पुणे व बार्शी  येथे घडली. रमजान खलील पटेल  (रा. मुंढवा, पुणे, हल्ली काटेगाव, ता. बार्शी)   बलात्कार केल्याप्रकरणी व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कलमान्वये  गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव  आहे.त्याला  अटक करून बार्शी न्यायालयात उभे केले असता  25 जानेवारीपर्यंत    पोलिस कोठडी देण्यात आली आहे. 

पुणे (मुंढवा) येथील पीडित 32 वर्षीय  महिलेने पांगरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्या पुणे येथे राहण्यास असताना पहिला पती सूर्यकांत पौळ याने त्याचे लग्न झालेले असतानाही फिर्यादीस फसवून लग्न केले होते. त्यामुळे फिर्यादीने पहिल्या पतीविरोधात न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यामुळे त्या आईकडे राहण्यास असताना त्यांची व पटेल यांची ओळख झाली. 
ओळखीनंतर पटेल यांनी फिर्यादीस फिरण्यास जाण्याचा खोटा बहाणा करून बसने बार्शी येथे घेऊन गेला. नंतर काटेगाव येथील कोट्यावर घेऊन जाऊन त्यांना  लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. तसेच 2013 ते नोव्हेंबर 2017 दरम्यान लग्नाचे आमिष दाखवत वारंवार बलात्कार केला.

 पहिल्या पतीकडून पोटगीपोटी आलेले 3,50,000 रुपयेही फिर्यादीस गोड बोलून पटेल याने घेतले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.पटेल याच्यापासून फिर्यादीस  मुलगी असून तरीही पटेल हे लग्नास नकार देत  असल्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पटेल याच्याविरूद्ध बलात्कार करून लग्न न केल्याप्रकरणी व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कलमान्वये पांगरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विजय कबाडे हे करत आहेत.