Sun, Nov 18, 2018 23:55होमपेज › Solapur › बलात्कारप्रकरणी मुंबईच्या पोलिसासह चौघांवर गुन्हा

बलात्कारप्रकरणी मुंबईच्या पोलिसासह चौघांवर गुन्हा

Published On: May 23 2018 11:35PM | Last Updated: May 23 2018 11:25PMसोलापूर : प्रतिनिधी

लग्नाचे आमिष दाखवून गेल्या पाच वर्षांपासून अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेऊन लग्नास नकार देणार्‍या मुंबईच्या पोलिसासह चौघांवर बलात्कार केल्याप्रकरणी सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर राजू राठोड, विनोद राजू राठोड, राजू शिवाजी राठोड, कांताबाई राजू राठोड (रा. बसवेश्‍वरनगर, देगाव, ता. उत्तर सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित मुलीने फिर्याद दाखल केली आहे. सागर राठोड हा मुंबई पोलिस दलात कार्यरत आहे. यातील पीडित मुलगी ही 16 वर्षांची असताना म्हणजे जून 2013 पासून ते सन 2016 मधील रक्षाबंधनाच्या दिवसापर्यंत सागर राठोड याने त्याची आई कांताबाई व भाऊ विनोद याच्यामार्फत त्यांच्या बसवेश्‍वरनगर येथील घरी बोलावून लग्नाचे आमिष दाखवून पीडितेच्या इच्छेविरुद्ध वारंवार जबरदस्तीने शारीरिक नैसर्गिक व अनैसर्गिक संभोग केला. 

सागर राठोड याने पीडितेसोबत लग्न करतो असे म्हणून साखरपुडा करूनदेखील लग्नात हुंडा म्हणून 10 लाख रुपये व 10 तोळे सोन्याची मागणी करून तसेच बुलेट गाडीची मागणी करुन लग्नास नकार देऊन पीडितेची फसवणूक केली.  सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक डी. के. वाघ तपास करीत आहेत.