Sun, Sep 23, 2018 05:01होमपेज › Solapur › सोलापूर : सहा वर्षाच्या मुलीवर बापाकडूनच बलात्कार

सहा वर्षाच्या मुलीवर बापाकडूनच बलात्कार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : पुढारी ऑनलाईन

सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिचा लैंगिक छळ करणार्‍या नराधम बापाविरुद्ध एमआयडीसी पोलिस   ठाण्यात  गुन्हा  दाखल करण्यात येऊन पित्यास अटक केली आहे. माणसांच्या एकमेकांच्या नात्यालाच काळिमा फासणारी ही घटना शहरातील नई जिंदगी परिसरात घडली.

याबाबत  पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून बापाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील  नई   जिंदगी  परिसरातील महादेवीनगरात पीडित मुलगी, तिची आई व नराधम बाप हे तिघे एकत्रित राहतात. नराधम बाप हा मजुरीचे काम करतो, तर पीडितेची आई ही घरीच असते. गेल्या अनेक महिन्यांपासून संबंधित बापाने स्वतःच्या मुलीवर अनेक वेळा बलात्कार करून तिचा लैंगिक छळ केला. या बाबीची समाजात अन्य लोकांना माहिती झाली, तर आपलीच बदनामी होईल, या भीतीपोटी पीडितेच्या आई गप्प बसली; परंतु तिला मुलीचा त्रास पाहवेना. अखेर तिने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

Tags : solapur, solapur news, rape case, bad father, 


  •