Thu, Aug 22, 2019 03:49होमपेज › Solapur › अल्पवयीन मुलीवर बलात्कार; दोघांवर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; दोघांवर गुन्हा दाखल

Published On: Jan 18 2018 1:45AM | Last Updated: Jan 17 2018 9:54PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन तिच्याबरोबर काझीकडून लग्न करून तिचे नाव बदलून तिच्याशी शरीरसंबंध ठेवल्याप्रकरणी तरुणासह दोघांविरुध्द विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अझरूद्दीन दाऊद शेख (रा. कुमठे गाव, ता. उत्तर सोलापूर) आणि बेकायदेशीर लग्न लावणारा काझी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्तीने फिर्याद दाखल केली आहे.

यातील पीडित मुलगी ही अल्पवयीन असून तिला अझरूद्दीन शेख याने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. शेख याने त्याच्या नातेवाईकांसमक्ष काझीकडून पीडित मुलीशी लग्न करून तिचे नावदेखील बदलले. त्यानंतर शेख याने पीडित मुलीशी शरीरसंबंध ठेवले. म्हणून विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अझरूद्दीन शेख यास पोलिसांनी अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक साळुंखे तपास करीत आहेत.

महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करणार्‍या तरुणावर गुन्हा दाखल
महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करून तिचा लैंगिक छळ करणार्‍या तरुणाविरुद्ध जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्तिक मुरली श्रीपती (रा. घोंगडे वस्ती, भवानी पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित तरुणीच्या नातेवाईकांनी फिर्याद दाखल केली आहे.

पीडित तरुणी ही महाविद्यालयात शिकत असून गेल्या अनेक महिन्यापासून कार्तिक श्रीपती हा तिचा पाठलाग करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता. याबाबत पीडित तरुणीने श्रीपतीच्या आई-वडिलांसमोर त्याला समजावले होते. तरीही श्रीपती हा तिचा पाठलाग करीत होता. पीडित तरुणी ही महाविद्यालयात गेली असताना तिच्या मैत्रिणीच्या मोबाईलवर फोन करून श्रीपती बोलला. म्हणून जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

उमानगरीमध्ये 33 हजारांची चोरी
जुनी मिल कंम्पौडमध्ये असलेल्या उमानगरीमध्ये राहणार्‍या दिनेश दत्तात्रय बंकापूर (वय 41) यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने घरातून सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईल असा 33 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक खेडकर तपास करीत आहेत.

दंत महाविद्यालयातून मोबाईल चोरी
केगाव येथील पंडित दीनदयाळ दंत महाविद्यालयाच्या कृत्रिम दंत शास्त्र विभागातील टेबलावर ठेवलेला  8 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरट्याने चोरून नेला. याबाबत स्नेहा विश्‍वनाथ राठोड (वय 25, रा. सैफुल, विजापूर रोड) हिने दिलेल्या  फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली.  हवालदार मोरे तपास करीत आहेत.