Sat, Jul 20, 2019 13:16होमपेज › Solapur › सोलापूर : सदाभाऊंची गाडी फोडणार्‍याचा शेट्टींकडून सन्मान

सदाभाऊंची गाडी फोडणार्‍याचा शेट्टींकडून सन्मान(Video)

Published On: Feb 26 2018 10:38PM | Last Updated: Feb 26 2018 11:01PMमाढा : पुढारी ऑनलाईन

एकेकाळचे सहकारी आणि आता दुरावलेले शेतकरी नेते राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात चांगलीच राजकीय जुगलबंदी रंगली आहे. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची गाडी फोडणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बापू गायकवाड यांच्या पाठीवर थाप राजू शेट्टींनी थाप टाकली. सोमवारी शेट्टी यांच्या हस्ते गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला. 

वाचा : शेट्टींचा खोटे बोलण्यात हातखंडा : सदाभाऊ खोत 

माळशिरस तालुक्यातील भांबूर्डी येथील कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी खासदार शेट्टी आले होते. त्यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची गाडी फोडणारे माढा तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांना खास "आवताणं" पाठवून भांबूर्डी येथे बोलविले होते. यावेळी बापू गायकवाड याचा सत्कार खासदार शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पाटील, कार्याध्यक्ष महावीर सावळे, संघटक सिध्देश्वर घुगे, सत्यवान गायकवाड उपस्थित होते.

वाचा : ...तर मी निवडणूक लढवायचे बंद करेन : राजू शेट्टी 

वाचा : शेतकर्‍यांना गोळ्या घालणार्‍यांच्या गळ्यात गळे कसे काय? : ना खोत

बापू गायकवाड याने रिधोरे ता. माढा येथे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या ताफ्यातील गाडीची काच लोखंडी पाईपने फोडली होती.

संबंधित : 

बांडगुळांना मी घाबरत नाही : सदाभाऊ (Video)

सोलापुरात 'स्वाभिमानी'ने सदाभाऊ खोतांची कार फोडली (Video)

"सुरवात शेट्टीने केलीय याचा शेवट आम्ही करू" : खोत यांचा इशारा