Fri, Jul 19, 2019 15:41होमपेज › Solapur › मनसेच्या स्वस्त पेट्रोल उपक्रमाला मिळाला वाहनधारकांचा प्रतिसाद

मनसेच्या स्वस्त पेट्रोल उपक्रमाला मिळाला वाहनधारकांचा प्रतिसाद

Published On: Jun 14 2018 10:37PM | Last Updated: Jun 14 2018 9:32PMपंढरपूर : प्रतिनिधी

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 50 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून  मनसेचे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे यांनी प्रती लिटर चार रुपये दराने शहरातील चारही पंपावर स्वस्त पेट्रोल विक्रीचा अभिनव उपक्रम राबवला.शहरातील चार पंपावर स्वस्त पेट्रोल देण्याच्या या उपक्रमाला नागरिकांचाही मोठा प्रतिसाद मिळाला. दिवसभरात जवळपास 25 हजार लिटर पेट्रोलची स्वस्त दरात विक्री झाल्याचे मनसेच्यावतीने सांगण्यात आले.

देशात व राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. इंधन दरवाढीचा थेट परिणाम सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनावर झाला आहे. महागाईने होरपळणार्‍या राज्यातील सर्वसामान्य लोकांना थोडा फार दिलासा मिळावा  म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी  पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 14 जून रोजी  दिवस भरासाठी तरी प्रती लिटर चार रुपये पेट्रोल स्वस्त देऊन केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध  नोंदवला  आहे.

 गुरूवारी सकाळी लिंकरोडवरील देशमुख पंपावर जिल्हा संघटक दिलीप धोत्रे यांच्या हस्ते स्वस्त दरातील पेट्रोल वितरण उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.  यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाहनचालकांना राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुलाब पुष्प व पेढे देयात आले.  स्वस्त पेट्रोल सुरु असल्याने शहरातील चारही पंपावर सकाळपासूनच ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. याबरोबरच येथील पालवी संस्थेतील मुलांना फराळाचे वाटपही  दिलीप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला मनसेचे शशिकांत पाटील, दिलीप पाचंगे, सिध्देश्‍वर गरड, अर्जून जाधव, अनिल बागल, प्रसाद वाघमारे, बालाजी गोवे, रवी शिंदे, जेम्स फिलिप्स, सौरव गुरव, अक्षय गुरव, चंद्रकांत निकम, नवनाथ खपाले, दीपक भोसले, विकास घोडके, भारत कदम, सुनील भोले, प्रथमेश कट्टे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.