Wed, Jan 23, 2019 06:24होमपेज › Solapur › मोसमातील पहिल्याच दिवशी पावसाची हजेरी

मोसमातील पहिल्याच दिवशी पावसाची हजेरी

Published On: Jun 01 2018 8:38AM | Last Updated: Jun 01 2018 8:38AMबोंडले  : विजयकुमार देशमुख

यंदाच्या पावसाळी मोसमाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ जुन रोजी माळशिरस तालुक्यात रोहिणी नक्षत्रामध्ये पावसाने हजेरी लावली. आज सकाळी ५.३५ वाजता माळशिरस तालुक्यातील पुर्व भागात मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली आहे.

माळशिरस तालुक्याच्या पुर्व भागात बोंडले, तोंडले, दसुर, खळवे, जांबुड, माळखांबी, विठ्ठलवाड, उघडेवाडी, वेळापुर या भागात रात्री ३ नंतर मेघगर्जना झाली. यानंतर आलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. तसेच वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्यामुळे पिकांनाही याचा फायदा होणार आहे.