Wed, Sep 19, 2018 16:58होमपेज › Solapur › सोलापूर परिसरात वादळी वारे ; झाड व विजेचा खांब कोसळला 

सोलापूर परिसरात वादळी वारे ; झाड व विजेचा खांब कोसळला 

Published On: May 19 2018 9:09AM | Last Updated: May 19 2018 9:09AMमाळीनगर  : गोपाळ लावंड 

काल जवळपास सगळीकडे  पाऊस, वादळी वारे, विजांचा कडकडाटाने यांनी अक्षरशः थैमान घातले होते. माळशिरस तालुक्यातील अनेक ठिकाणी यामुळे फळबागा, शेतातील पिके यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

माळीनगर परिसरातदेखील काल दिवसभर उन्हाचा तीव्र तडाखा होता मात्र सायंकाळी ढग जमून वादळी वार्‍याला सुरूवात झाली. त्‍यानंतर महर्षिनगर परिसरातील कारखाना चाळीसमोरील लिंबाचे झाडं उन्मळून तात्पुरता उभा केलेल्या खोलीवर कोसळून नुकसान झाले आहे, तसेच विजेचा खांब देखील वाकला असून विजेच्या तारा तुटल्याने विजप्रवाह खंडीत झाला आहे.
ज्या खोलीवर जाड कोसळले येथील संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले असून सुदैवाने  कोणासही इजा झाली नाही.