Thu, Jul 18, 2019 04:05होमपेज › Solapur › रेल्वेचे सरकत्या जिन्याचे काम संथगतीने

रेल्वेचे सरकत्या जिन्याचे काम संथगतीने

Published On: Jul 14 2018 12:57AM | Last Updated: Jul 14 2018 12:32AMसोलापूर : प्रतिनिधी

रेल्वेस्थानकावरील सरकत्या जिन्याचे काम संथगतीने होत आहे. एप्रिल महिन्यामध्ये रुजू होणारा सरकता जिना ऑगस्टपर्यंत प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूरकर व येथे येणारे प्रवासी व पर्यटक सोलापूर रेल्वेस्थानकावर सरकत्या जिन्याचे काम पाहून जात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून बारगळलेले काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे.

सोलापूरसह  गुलबर्गा व साईनगर शिर्डी रेल्वेस्थानकावर सरकते जिने बसविले जाणार आहेत. सोलापूर रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर सरकता जिना बसविला जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जिना बांधणीचे काम चालू आहे. एका खासगी कंपनीला याचा ठेका देण्यात आला आहे.

प्लॅटफॉर्म क्र. 1 वरच आधुनिक प्रकारची लिफ्ट बसविण्यात आली आहे. त्यासोबत आता सरकता जिना प्रवाशांच्या सेवेसाठी लवकरच  उपलब्ध होईल. हा जिना प्लॅटफॉर्म क्र. 1 वरुन 2 व 3 ला जोडल्याने त्या प्लॅटफॉर्मवर येणार्‍या प्रवाशांसाठी याचा उपयोग होईल.

प्लॅटफॉर्म क्र. 2, 3 व 4 वर येथे लांबपल्ल्यांच्या एक्स्प्रेस थांबतात.वातानुकूलित एक्स्प्रेसदेखील याच प्लॅटफॉर्मवर थांबा घेतात. परंतु अनेक प्रवाशांची अशी मागणी आहे की, लांबपल्ल्यांच्या व वातानुकूलित एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्र. 1 वर थांबवाव्यात.