Thu, Nov 15, 2018 22:37होमपेज › Solapur › राजुरीत जुगार अड्ड्यावर छापा

राजुरीत जुगार अड्ड्यावर छापा

Published On: Sep 04 2018 1:20AM | Last Updated: Sep 03 2018 11:28PMसांगोला : तालुका प्रतिनिधी 

राजुरी (ता. सांगोला) येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळणार्‍या 18 जणांना ताब्यात घेऊन सुमारे 4 लाख 33 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी सायंकाळी करण्यात आली.

राजुरी येथे काही व्यक्‍ती जुगार खेळत असल्याची माहिती मंगळवेढा उपविभागीय कार्यालयाला मिळाली. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि वैभव मारकड व त्यांच्या पथकाने रविवारी राजुरी येथील काका दबडे यांच्या शेतातील घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. 
त्यावेळी जुगार खेळणार्‍या 18 जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले.नंदकुमार वसंत पवार (रा. वाटंबरे), रमेश भीमा निंबाळकर (रा. जवळा), शिवाजी भगवान भंडारे (रा. नाझरे), सतीश बाबा बावदाने (रा. जवळा), शिवाजी वसंत लोहार (रा. नाझरे), कबीर लहू मोरे (रा. मेडशिंगी), बाळू लक्ष्मण माने (रा. नाझरे), समीर जाफर मुलाणी (रा. नाझरे), बाबासाहेब तात्यासो 

बाबर (रा. आवंढी, ता. जत), बाळू सोमा करवर (रा. राजुरी), गोरख मदन शिंदे (रा. नाझरे), बजरंग सखाराम बंडगर (रा. राजुरी), पिंटू जगन्‍नाथ बंडगर (रा. राजुरी), मंगेश राजकुमार रायचुरे (रा. नाझरे), आनंद ज्ञानू बंडगर (रा. राजुरी), रामचंद्र विठोबा दबडे (रा. राजुरी), संजय बाबा व्हरगर (रा. राजुरी), चंद्रकांत भालचंद्र येलपले (रा. अजनाळे) त्यांच्याकडून 82 हजार 720 रुपये रोख रक्‍कम, 3 लाख रुपये किमतीच्या 10 मोटारसायकली, 51 हजार रुपये किमतीचे 9 मोबाईल व जुगार साहित्य असा 4 लाख 33 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत मंगळवेढा पोलिस ठाण्याचे सपोनि वैभव मारकड यांनी वरील 18 जणांविरुद्ध सांगोला पोलिसांत फिर्याद दिली आहे.