होमपेज › Solapur › कुर्डू येथे जुगार अड्ड्यावर छापा, 7 जण ताब्यात 

कुर्डू येथे जुगार अड्ड्यावर छापा, 7 जण ताब्यात 

Published On: Feb 15 2018 1:58AM | Last Updated: Feb 14 2018 8:54PMसोलापूर : प्रतिनिधी 

कुर्डू ते लऊळ रोडवरील कुर्डू शिवारातील गायरानात सुरू असलेल्या मन्ना नावाच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी 2 लाख 38 हजारांच्या मुद्देमालासह 7 आरोपींना ताब्यात घेतले.

पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून व त्यांच्या आदेशान्वये अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी कुर्डुवाडी पोलिस पेट्रोलिंग करीत होते. कुर्डू शिवारातील पोपट नरसू माळी याचे वीट्टभट्टी मागील गायरानात झाडाखाली मटका जुगार सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली. 

त्यानुसार मंगळवारी सायंकाळी 5 च्या सुमारास या जुगार अड्ड्यावर छापा टाकून आरोपी पोपट नरसू माळी, संतोष संताजी पाटील, संभाजी कृष्णा गायकवाड, मोहन रघुनाथ उपासे, बिभीषण राजाराम जगताप, दत्ता बापू गायकवाड, हणमंत रामचंद्र जगताप (सर्व रा. कुर्डू, ता. माढा) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 2 लाख 38 हजार 820  रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या 7 आरोपींविरूद्ध कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून सध्या अवैध व्यवसायांवर सर्व तालुक्यात कारवाई सुरू आहे. त्यामुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई पोलिस सपोनि संदीप धांडे, पोहेकॉ अकुंश मोरे, पो.ना अमृत खेडकर, पोकॉ बाळराजे घाडगे, सुरेश लामजाने, सागर ढोरे-पाटील, अमोल जाधव, बालाजी नागरगोजे यांच्या  टीमने केली.