Fri, May 24, 2019 02:43होमपेज › Solapur › हॉटेल जय मल्हार ऑर्केस्ट्रा बारवर कारवाई; 11 जण ताब्यात

हॉटेल जय मल्हार ऑर्केस्ट्रा बारवर कारवाई; 11 जण ताब्यात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

केगाव ते हिरज रोडवरील हॉटेल जय मल्हार ऑर्केस्ट्रा बारवर फौजदार चावडी पोलिसांनी छापा घालून तोकड्या कपड्यात नाचणार्‍या बारबालांसह 11 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई रविवारी पहाटे दीडच्या सुमारास करण्यात आली.

तानीया बिरजसिंग (वय 25), कविता राकेश शर्मा (वय 33), रिपत गुलअहमद शेख (वय 27), शबा रहिम शेख (वय 24), बागवान तकलीम मिठाईवाले (वय 28), मारिया अब्दुलकादीर तीनवाला (वय 28), शुभम भगतसिंग (वय 22), नरेंद्र मारुती सावंत (वय 42), मुरलीधर शाम कवडे (वय 42), सौदागर गोडसे (वय 35), शांतय्या कन्हैय्या हिरेमठ (वय 27, सर्व रा. सोलापूर) आणि ऑर्केस्ट्रा बारचा चालक दिनेश गोपाळ पवार (वय 35, रा. सूर्या हॉटेलमागे, मुरारजी पेठ, सोलापूर) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस शिपाई कृष्णात कोळी यांनी फिर्याद दाखल केली आहे.

केगाव ते हिरज रोडवरील दंत महाविद्यालयासमोर असलेल्या हॉटेल जय मल्हार ऑर्केस्ट्रा बारमध्ये बारबाला या तोकड्या कपड्यांमध्ये अश्‍लील नृत्य करीत असल्याची माहिती फौजदार चावडी पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ऑर्केस्ट्रा बारवर छापा घातला. त्यावेळी बारमध्ये बारबाला या तोकड्या कपड्यात अश्‍लील नृत्य करून ग्राहकांना आकर्षित करत होत्या. ग्राहकांशी लगट करून अश्‍लील हावभाव करून ग्राहकांकडून पैसे घेत असल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी रोख 2700 रुपये जप्त केले असून याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Tags : Solapur, Solapur News, raid at Hotel, Jai Malhar Orchestra Bar; 11 people arrested


  •