Fri, Mar 22, 2019 07:55होमपेज › Solapur › तूर खरेदीची एकरी मर्यादा वाढणार : सुभाष देशमुख‍

तूर खरेदीची एकरी मर्यादा वाढणार : सुभाष देशमुख‍

Published On: Feb 07 2018 1:01PM | Last Updated: Feb 07 2018 1:01PMमुबंई : प्रतिनिधी

तूर खरेदीची सध्याची एकरी मर्यादा कमी असल्याने शेतकऱ्यांना तूर विक्रीसाठी अडचण येत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी तूर खरेदीची एकरी मर्यादा वाढविण्यात येत असल्याची माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.

राज्यभरात १६० केंद्रावर हमीभावाने तूर खरेदी १फेब्रुवारी पासून सुरू झाली आहे. तूर हे आंतरपीक असल्यामुळे किमान आधारभूत किंमत योजनेतर्गत तूर खरदीसाठी आतापर्यंत उत्पादकता ठरविण्यासाठी तूर पेऱ्याखाली असलेल्या क्षेत्राच्या २० टक्के क्षेत्र ग्राह्य धरण्यात येत होते. ते क्षेत्र आता १०० टक्‍के ग्राह्य धरण्यात येईल.

यामुळे शासनाला शेतकऱ्यांकडून निकषांपेक्षा जास्त तूर हमी भावाने खरेदी करता येईल. तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेतला असल्याचे देशमुख यांनी सांगीतले.