होमपेज › Solapur › दै.‘पुढारी’वर शुभेच्छांचा वर्षाव

दै.‘पुढारी’वर शुभेच्छांचा वर्षाव

Published On: Jan 03 2018 1:18AM | Last Updated: Jan 02 2018 11:02PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

निर्भीड व निःपक्ष दै. ‘पुढारी’च्या 79 व्या वर्धापनदिनानिमित्त सोलापुरातील दि हेरिटेज लॉनवर आयोजिलेल्या स्नेहमेळाव्यास मान्यवरांसह असंख्य वाचकांनी हजेरी लावत शुभेच्छांचा वर्षाव केला. 

दै. ‘पुढारी’ने निर्भीड पत्रकारितेचा वसा जोपासला आहे. 79 व्या वर्षांची वाटचाल पूर्ण करीत 80 व्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त सोलापूर  कार्यालयातर्फे सोमवारी सायंकाळी  गांधीनगर येथील दि हेरिटेज लॉनवर स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजता या स्नेहमेळाव्यास सुरुवात झाली. 

यावेळी दै. ‘पुढारी’च्यावतीने  हेमंत चौधरी, श्रीकांत साबळे यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, आ. प्रणिती शिंदे, महापौर शोभा बनशेट्टी, स्थायी समिती सभापती संजय कोळी, परिवहन समिती सभापती दैदिप्य वडापूरकर, माजी आ. नरसय्या आडम, अनिल वासम, जि.प. महिला व बालकल्याण समिती सभापती रजनी देशमुख, समाजकल्याण सभापती शीला शिवशरण, कृषी व पशुसंर्वधन समिती सभापती मल्‍लिकार्जुन पाटील, जि.प. पक्षनेता आनंद तानवडे, जि.प. सदस्य उमेश पाटील, बाळराजे पाटील, ग्रामीण पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, पोलिस आयुक्‍त महादेव तांबडे, पोलिस उपायुक्‍त पौर्णिमा चौगुले, सहाय्यक पोलिस आयुक्‍त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, राष्ट्रीय महामार्ग  प्राधिकरणचे  प्रकल्प  संचालक संजय कदम,  जि.प. अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही. बनसोडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, राज्य सहकारी बँकेचे संचालक अविनाश महागावकर, मनोरमा बँकेचे अध्यक्ष श्रीकांत मोरे, शोभा मोरे, डॉ. रविंद्र चिंचोळकर, अंबादास भास्के, प्रा. मधुकर जक्‍कन, सोलापूर विद्यापीठ अधिकारी सोमनाथ सोनकांबळे, डॉ. अनिल घनवट, महापालिका उपायुक्‍त त्र्यंबक ढेंगळे-पाटील, नगरअभियंता लक्ष्मण चलवादी, पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी, सचिव दशरथ गोप, संचालक श्रीधर चिट्याल, विक्रम पिस्के, नगरसेविका रामेश्‍वर  बिर्रु, आनंद बिर्रु, नागेश सरगम, निरंजन बोध्दूल, गौरीशंकर कोंडा, श्रीनिवास यन्‍नम (कामटे), साबळे-वाघीरे विडी कंपनीचे सरव्यवस्थापक बाळासाहेब जगदाळे, पुरुषोत्तम बलदवा, नंदकुमार यल्ला, पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष विजय चिप्पा, प्रेसिडेंट धनंजय मुदगुंडी, सरचिटणीस दत्तात्रय बडगू, कार्याध्यक्ष श्रीनिवास दिड्डी, सहसचिव शेखर इगे, निलेश चिलवेरी, दिवेश रिकमल्ले, विश्‍वनाथ रव्वा, विजयकुमार ताटीपामूल,  नगरसेवक श्रीनिवास रिकमल्‍ले, गोपी वडेपल्‍ली, भाजप कामगार आघाडीचे नागेश पासकंटी, सुकुमार सिध्दम, प्रा. विठ्ठल वंगा, अमृतदत्त चिन्‍नी, नागनाथ सोमा, मनोहर इगे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या लोलगे, मल्लेश बडगू, आनंद मुस्तारे, सी. ए. बिराजदार, महेश निकंबे आदींसह सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, उद्योग, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी दै. ‘पुढारी’स शुभेच्छा दिल्या. 

या स्नेहमेळाव्यास बार्शी, अक्कलकोट, माढा, करमाळा आदी तालुक्यांतील  वाचक, जाहिरातदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.