Sun, Apr 21, 2019 06:22होमपेज › Solapur › धनगर आरक्षण : अनुसुचित जमातीमध्ये समावेशासाठी मोहोळ मध्ये मोर्चा

धनगर आरक्षण : अनुसुचित जमातीमध्ये समावेशासाठी मोहोळ मध्ये मोर्चा

Published On: Aug 14 2018 6:40PM | Last Updated: Aug 14 2018 6:40PMमोहोळ : वार्ताहर 

धनगर आणि धनगड दोन्ही एकच असून शब्दाचा अपभ्रंश करुन सरकारने धनगर समाजाला वंचित ठेवले आहे. धनगड ही जमात कुठेच अस्तित्वात नसताना सरकारकडून खोटी आकडेवारी प्रसिद्ध केली जात आहे. त्यामुळे धनगर समाज बांधव त्यांचा अनुसुचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी आंदोलन करत आहे. याच मुख्य मागणीसाठी मंगळवारी १४ ऑगस्ट रोजी धनगर समाज बांधवांच्या वतीने मोहोळ तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
आज (दि. १४) सकाळी ११ वाजता धनगर बांधवांच्या मोर्चाला सुरुवात झाली. शिवाजी चौक मार्गे मेन रोडने हा मोर्चा मोहोळ तहसील कार्यालय येथे धडकला. यानंतर जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

यावेळी बोलताना रिपब्लीकन पिपल्स फ्रंटचे महाराष्ट्र अध्यक्ष धनंजय आवारे यांनी "आरक्षण हे कोणत्या जातीसाठी नसून ते राष्ट्र निर्माणासाठी आहे. मात्र आज काही समूहांकडून आरक्षणाविषयी संभ्रम निर्माण करून समाजात गैरसमाज पसरविले आहेत. धनगर समाज बांधव न्याय्य मागणीसाठी जनआंदोलन करीत आहेत. त्यामुळे सरकारने तात्काळ धनगर समाजाचा समावेश अनुसुचित जमातीमध्ये करण्याची गरज असल्याचे प्रतिपाद यांनी केले. यानंतर जेष्ठ नेते नागनाथ क्षीरसागर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी पं.स. सभापती समता गावडे, शिवसेनेचे नेते दादासाहेब करणावर, बाबासाहेब वाघमोडे, भागवत शिंदे, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष धनाजी गावडे, सुनिल पाटील, शामराव पाटील, नागनाथभाऊ  क्षिरसागर, संजय क्षिरसागर, दिनेश घागरे, सुनील पाटील, सोमेश क्षिरसागर, मालती टेळे, बाळासाहेब वाघमोडे, धनाजी गावडे, धनाजी पुजारी, सिध्देश्वर आवारे, गणेश गावडे, गणेश खताळ, बिरूदेव देवकते, रामचंद्र पाटील, तात्या पाटील, आप्पा वाघमोडे, कबीर, वाघमोडे, महेश गावडे, बिरु कोळेकर, लक्ष्मण शिंदे, पप्पू तरटे, आण्णासाहेब पाटील, विठ्ठल कारंडे, परमेश्वर सरक, बाबासाहेब वाघमोडे, दिलीप टेकाळे, सुशील क्षिरसागर, भुंजग मळगे, रावसाहेब चोरमले, तुषार करणावर, अनंता माने, मोहन होनमाने, फंटु कोकरे, कुंडलिक गावडे, शाहीर सलगर, राजु सलगर यांच्या पदाधिकाऱ्यांसह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोर्चाचे सुत्रसंचालन बाळासाहेब वाघमोडे यांनी केले. आभार सुशील क्षीरसागर यांनी मानले. यावेळी धनगर बांधवांनी गजढोल, झांज वाजवून मोहोळ शहर परिसर दणाणून सोडला.

यावेळी धनगर बांधवांनी समाजाला अनुसुचित जातीमध्ये समाविष्ट करावे, संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून "धनगर /धनगड" दुरुस्ती बिल पास करावे, सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे, धनगर आरक्षणासाठी शहिद झालेल्या परमेश्वर घोंगडे आणि योगेश कोरके यांच्या वारसांना शासनाने २५ लाख रुपयांची मदत करावी, आंदोलना दरम्यान धनगर बांधवांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे इत्यादी मागण्यांचे निवेदन तहसीलदार किशोरसिंह बडवे यांना देण्यात आले. 

लोकशक्ती परिवाराचे जेष्ठ नेते मनोहरभाऊ डोंगरे, ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष तथा नगराध्यक्ष रमेश बारसकरकर, रिपब्लीकन पिपल्स् फ्रंटचे महाराष्ट्र अध्यक्ष धनंजय आवारे, भीम युवा प्रतिष्ठाणचे संस्थापक अॅड. विनोद कांबळे आदींनी या मोर्चात सहभाग घेवून धनगर बांधवांच्या मागणीला पाठींबा दिला.