Tue, Sep 25, 2018 00:49



होमपेज › Solapur › मंगळवेढ्यात प्रेतयात्रा काढून राज्य सरकारचा निषेध

मंगळवेढ्यात प्रेतयात्रा काढून राज्य सरकारचा निषेध

Published On: Aug 07 2018 9:16PM | Last Updated: Aug 07 2018 9:16PM



सोलापूर : पुढारी ऑनलाईन 

मराठा आरक्षणासाठी गेली सहा दिवसा पासून मंगळवेढा येथील दामाजी चौकामध्ये मराठा क्रांती मोर्चा यांच्यावतीने  ठिय्या आंदोलन सुरू आहे. मंगळवारी सहाव्या दिवशी मराठा आरक्षणाचा मुद्द्यावर हे सरकार चालढकल करत असल्याचा निषेधार्थ शेकडो कार्यकर्त्यांनी सरकारचे श्राद्ध घातले. यावेळी एक मराठा लाख मराठा घोषणा देण्यात आल्या आणि शासनाचा निषेध करण्यात आला.

यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने दामाजी चौक ते चोखामेळा चौकापर्यंत कै.फेकेंद्र फसवणीस यांची प्रेतयात्रा काढण्यात आली. बेमुदत ठिय्या आंदोलनातील कार्यकर्ते यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं अशा घोषणा देऊन गेली १७ महिने झालं तरी हे सरकार मागासवर्गीय आयोगालाच पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. राज्य सरकारने आडमुठी भूमिका घेतल्यास आमचा आडमुठेपणा तुम्हाला परवडणारा नसेल असा इशारा दिला आहे.