Thu, Sep 20, 2018 02:35होमपेज › Solapur › सोलापूर: मोहिते-पाटील यांच्या पुतळ्याविरोधात उपोषण(व्हिडिओ)

सोलापूर: मोहिते-पाटील यांच्या पुतळ्याविरोधात उपोषण(व्हिडिओ)

Published On: Jan 25 2018 1:48PM | Last Updated: Jan 25 2018 1:42PMमाळशिरस : प्रतिनिधी

माळशिरस पंचायत समितीच्या सभागृहात राष्ट्रपुरषांऐवजी सहकार महर्षी शंकरराव मोहीते-पाटील यांचा पुतळा बसविण्याच्या निषेधार्थ आज पंचायत समिती कार्यालया उपोषण सुरु करण्यात आले आहे. विरोधी पक्षाचे पंचायत समिती सदस्य, जि.प सदस्य विविध गावचे सरपंच, विरोधी राजकीय पक्ष, विविध संघटनांचे पदाधीकारी या उपोषणात सहभागी झाले आहेत. 

वाचा : ब्लॉग : सहकार महर्षींच्या पुतळ्याला विरोध नकोच!

दरम्‍यान, पंचायत समिती कार्यालयात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.