Tue, Sep 25, 2018 13:25होमपेज › Solapur › बोराचे दर घसरल्याने शेतकर्‍यांनी केली मोडतोड

बोराचे दर घसरल्याने शेतकर्‍यांनी केली मोडतोड

Published On: Dec 10 2017 1:22AM | Last Updated: Dec 09 2017 10:41PM

बुकमार्क करा

माढा : वार्ताहर

बोराचे दर प्रतिकिलो 15 ते 20 रुपयांवरुन घसरुन दोन ते सहा रुपयांपर्यंत आल्याने मोडनिंब येथे बोर उत्पादक शेतकर्‍यांनी आडत बाजारातील व्यापार्‍यांच्या दुकानांची तोडफोड केली.  

याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीने संबंधित शेतकर्‍यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मागील पाच ते सहा दिवसांत वादळामुळे ढगाळ वातावरणामुळे मोडनिंब बाजारपेठेत बोर फळांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दर प्रतिकिलो दोन ते पाच रुपयांपर्यंत खाली आले. आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने दराची घसरण झाली. यापूर्वी बोराला चढे दर होता, तो 15 ते 20 रुपये होता. तो एकाएकी असा खाली घसरल्याने संतप्त शेतकरी संतोष कोळी, पोपट वसेकर, विजय सोलंकर (सर्व रा.अरण, ता. माढा) यांनी शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मोडनिंब बोर आडत बाजारातील समीर फ्रुट कंपनी, घोलप फ्रुट कंपनी, संगम फ्रुट कंपनी, चैतन्य फ्रुट कंपनी, एसके फ्रुट, अलिशान ट्रेडिंग, किसन फ्रुट कंपनी, गावडे फ्रुट कंपनी यांच्या नावाचे फलक तोडल्याने या व्यापार्‍यांनी लेखी निवेदन कृषी उत्पन्न बाजार समिती मोडनिंब यांच्याकडे दिले आहे. 

संचालक मोहन मोरे, रविकांत शहा, नागनाथ पाटील, माजी संचालक पोपट दोभाडा, बाजार समितीचे उपसचिव सतीश पाटील यांनी याबाबत मोडतोड करणार्‍यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. 

याबाबत संबंधित शेतकरी पोपट वसेकर, विजय सोलंकर, संतोष कोळी यांच्याशी संपर्क साधला असता आमची व मोडनिंब परिसरातील बोरे विक्रीसाठी सदर व्यापार्‍यांकडे आणली जातात. मात्र व्यापारी संगनमताने बोराचे दर काहीतरी निमित्त काढून दिवसेंदिवस कमी करत असल्याने शेतकर्‍यांचा उत्पादन खर्चसुध्दा निघणे दुरापास्त झाले असल्याचे सांगितले.