Wed, Jul 17, 2019 18:47होमपेज › Solapur › पंढरपूरची प्रियांका यूपीएससी परीक्षेत मुलींमध्ये देशात प्रथम

पंढरपूरची प्रियांका यूपीएससी परीक्षेत मुलींमध्ये देशात प्रथम

Published On: Jul 01 2018 12:11AM | Last Updated: Jul 01 2018 12:11AMपंढरपूर : प्रतिनिधी

सरकोली (ता.पंढरपूर) येथील प्रियांका पितांबर भोसले हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या सेंट्रल आर्मड पोलिस फोर्स परीक्षेमध्ये देशात मुलींमध्ये पहिली येण्याचा बहुमान मिळवला. प्रियांकाने जुलै 2017 मध्ये या पदासाठी लेखी परीक्षा दिली होती. 10 मे 2018 रोजी मुलाखत घेण्यात आली होती. 

शुक्रवारी (ता.29) निकाल  परिक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून यामध्ये प्रियांकाने मुलींमध्ये देशात पहिला तर सर्वसाधारणमध्ये देशात 33 वा क्रमांक पटकावला. सेंट्रल आर्मड पोलिस फोर्स ही परीक्षा पास होणारी प्रियांका भोसले ही सोलापूर जिल्ह्यातील  पहिली मुलगी  ठरली आहे. नुकत्याच राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तिची मुख्याधिकारीपदी निवड झाली आहे.  कु. प्रियांकाचे 12 वी पर्यंतचे शिक्षण मुंबई येथील रुपारेल कॉलेजमध्ये तर एल.एल.बी.चे शिक्षण मुंबईच्या शासकीय लॉ कॉलेजमध्ये झाले.   मुळची सरकोली येथील असलेल्या प्रियांका भोसले हिचे वडील पितांबर भोसले हे मंत्रालयात वरिष्ठ पदावर शासकीय सेवेत आहेत. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. निकाल जाहीर होताच सरकोली येथील ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला.